पुणे | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकात नरेंद्र मोदीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. या पुस्तकावरून भाजपवर देशभरातील शीवप्रेमींनी टीका केली आहे. यानंतर “सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर आहे. त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यावर शिवरायांच्या वंशजांनी आपली भूमिका घ्या, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आज (१४ जानेवारी) दुपारी १२.३० वाजता पुण्यातील पत्रकार परिषद माजी खासदार भाजप नेते उदयनराजे भोसले हे पुस्तकावर आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती त्यांनी ट्वीटरवरून दिली आहे.
‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर उद्या मंगळवार दि १४ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. pic.twitter.com/gN1qELbnab
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 13, 2020
उदयनराजे म्हणतात, “‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर उद्या मंगळवार दि १४ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत,” असे ट्वीटमध्ये म्हणाले आहे. उदयनराजे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुस्तकाविरोधात काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन
भाजपविरोधात आज (१४ जानेवारी) सकाळी ११ वाजता राज्यभर आंदोलन करुन तीव्र निषेध केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. शिवरायांच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेल्या भाजपाकडूनछत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे, असा आरोप थोरात यांनी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.