HW News Marathi
Covid-19

राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तर मुंबईतील ३७४ जणांना डिस्चार्ज | राजेश टोपे

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. लक्षणीय बाब अशी की ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२२ एप्रिल) दिली.

दरम्यान, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची ३७४ एवढी आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.

राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

या वयोगटातील लोकांनी केली कोरोना मात

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणत: ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुक्त ७२२ रुग्णांचा वयोगट आणि कंसात बरे झालेल्यांची संख्या: शून्य ते १० (१९); ११ ते २० (५९) ; २१ ते ३० (१६०); ३१ ते ४० (१६४); ४१ ते ५० (१५४); ५१ ते ६० (९८); ६१ ते ७० (४५); ७१ ते ८० (१५); ८१ ते ९० (७); ९१ ते १०० (१).

राज्यात घरी आलेल्या ७२२ रुग्णांची संख्या

  • अहमदनगर मनपा- ५
  • अहमदनगर ग्रामीण-११
  • औरंगाबाद मनपा- १४
  • बुलढाणा- ८
  • गोंदिया – १
  • हिंगोली – १
  • जळगाव मनपा -१
  • कल्याण-डोंबिवली मनपा- ३१
  • कोल्हापूर मनपा-२,
  • लातूर ग्रामीण-८
  • मीरा भाईंदर मनपा- ५
  • मुंबई मनपा- ३७४
  • नागपूर मनपा- १२
  • नाशिक – २
  • नवी मुंबई मनपा- १९
  • उस्मानाबाद- ३
  • पालघर ग्रामीण -१
  • पनवेल मनपा- १३
  • पिंपरी-चिंचवड मनपा- १२
  • पुणे मनपा- १२०
  • पुणे ग्रामीण- ५
  • रायगड ग्रामीण-३
  • रत्नागिरी-१
  • सांगली ग्रामीण- २६
  • सातारा- ३
  • सिंधुदूर्ग-१
  • ठाणे मनपा १६
  • ठाणे ग्रामीण- ४
  • उल्हासनगर मनपा- १
  • वसई-विरार मनपा- १२
  • यवतमाळ-७.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा दुप्पट

News Desk

राज्यात आज ६,७८५ नवे कोरोना रुग्ण आढळले तर २१९ रुग्णांचा झाला मृत्यू

News Desk

केंद्र-राज्य सरकारला ‘कोरोना’शी लढण्यासाठी सचिन तेंडुलकरकडून आर्थिक मदत

swarit