HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी ‘रॅपिड टेस्ट’ला केंद्राकडून मान्यता, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३४१ वर पोहचली आहे. करोना रुग्णांच्या तपासणीसाठी रॅपिड टेस्टला केंद्राने मान्यता दिली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला दिली. कोरोनाच्या पाश्वभूमीवर टोपे यांनी आज (२ एप्रिल) पत्रकार परिषदेत राज्यातील जनतेला संबोधित करताना सांगितले.

“राज्यात सध्या पाच हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल. तसेच ब्लड घेतल्यावर केवळ पाच मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारीही रॅपिड टेस्ट आहे,” असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. “त्याशिवाय त्यांनी सर्व्हेलेस म्हणजे ट्रेसिंग तपासणी करणे यावरही जोर दिला. आपण जे थ्री टी प्रिसिंपल म्हणतो त्यामध्ये ट्रेसिंग, ट्रकिंग करणे, टेस्टिंग करणे आणि ट्रिटमेंट करणे, याचा समावेश आहे. यामध्ये ट्रेसिंग करण्याचा जो भाग आहे त्यावर अधिक भर देण्यासंदर्भात त्यांनी सांगितले आहे. यामध्ये सर्व्हेलेस जो करायचा आहे ते म्हणजे जो पॉझिटिव्ह सापडला आहे त्याला क्वारंटाईन करायचे आहे,” असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची सख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण आणि रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचे निदान होत असल्याने लागण झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात कोविड रुग्णालयांची उभारणी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे – मुख्यमंत्री

News Desk

केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तरी राणेंना सुखाने झोप लागेल, शरद पवारांचा खोटक टोला 

News Desk

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयलच, पालकमंत्री नवाब मलिकांची माहिती!

News Desk