HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रासाठी येणारा ऑक्सिजन कर्नाटकात थांबवण्याचा हा निर्णय केंद्राचा !

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती आव्हानात्मक आहे. त्यातच आरोग्य यंत्रणेवर देखील मोठा ताण आहे. अगदी लसींपासून ऑक्सिजनच्या पुरवठ्यापर्यंत सगळ्याच गोष्टींचा तुटवडा आहे. या गंभीर स्थिती केंद्र सरकारकडून राज्याला ऑक्सिजन पुरवला जात असताना आता राज्य सरकारपुढे एक अडचण निर्माण झाली आहे. कारण, केंद्राकडून महाराष्ट्रात येणारा ५० मेट्रीक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकातच रोखण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे या संपूर्ण प्रकाराविषयी बोलताना म्हणाले की, “कर्नाटकात ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय हा केंद्राचा आहे. मात्र, या पद्धतीने लिक्विड ऑक्सिजनचा राज्याचा कोटा कमी करणे योग्य नाही. आजच्या आजच आम्ही याबाबत केंद्र सरकारकडे अपील करणार आहोत”, असे म्हणत राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना राज्य सरकारची याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे राज्यातील सांगली, कोल्हापूरसारख्या प्रमुख जिल्ह्यांसमोरचे आव्हान वाढणार आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी केंद्र सरकारला सांगून महाराष्ट्राला होणारा ५० मेट्रीक टन ऑक्सीजन पुरवठा थांबवला आहे. सांगली, कोल्हापूरसारख्या प्रमुख जिल्हे आणि आसपासच्या परिसरांतील आरोग्य यंत्रणांना ह्याचा फटका बसणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात नवी नियमावली जारी ! संध्याकाळी ५ वाजल्यानंतर लागू होणार संचारबंदी

News Desk

कोरोना संकटाचे भान ठेवून, आरोग्य जपत गणेशोत्सव साजरा करूया !

News Desk

चिंताजनक ! आरोग्यमंत्र्यांसह बैठकीत असतानाच मालेगाव आयुक्तांचा ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रिपोर्ट समोर

News Desk