HW News Marathi
Covid-19

आरोग्यमंत्री राजेश टोपे आज पुण्यातील NIV आणि नायडू हॅास्पिटलला भेट देणार

पुणे | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४२ वर गेली आहे. मात्र, उपचार सुरू असणाऱ्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यात ८०० टेस्टपैकी ४२ पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी काही जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे असे त्यांनी सांगितले.

पुण्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक १८ आहे.जिथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्याची पुष्ट झाली त्या नायडू हाॅस्पिटलला आज आरोग्यमंत्री भेट देणार आहेत. NIV अर्थात नॅशनल इन्स्टीट्यूट ॲाफ वायराॅलाॅजी जिथे कोरोना सॅम्पल टेस्ट केले जातात त्या ठिकाणीसुद्आधी आरोग्यमंत्री भेट देणार आहेत आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. वायरस पसरू नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. लोकांनी गर्दी कमी केली नाही तर लोकल ट्रेन बंद करावी लागेल, असे माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • राज्यातल्या ८०० टेस्टपैकी ४२ पाॅझिटिव्ह,अजून काही रिपोर्टस येणे बाकी.
  • पुण्यातल्या एनआयव्ही अर्थात नॅशनल इन्स्टीट्यूट ॲाफ वायराॅलाॅजी आणि नायडू हॅास्पिटलला भेट देणार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार.
  • बाहेरच्या देशातून आलेले आणि फक्त लक्षण असलेल्या लोकांचीचे टेस्ट होणार.
  • कोणीही क्रिटीकल नाही, उपचार सुरू असणाऱ्या रूग्णांची प्रकृती स्थिर.
  • संशयित रूग्णांसोबत दुजाभाव करू नका
  • सॅम्पल टेस्टींग कीट्स भारत सरकार पुरवणार
  • मुंबईकरांनी ऐकले नाही तर लोकल बंद करणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कडक लॉकडाऊन करा किंवा निर्बंध पूर्णतः काढा, राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांना विनंती 

News Desk

केंद्रातले ‘हे’मंत्री आजपर्यंत कोरोनाच्या विळख्यात अडकले ! पाहा यादी…

swarit

राज्यात आज २५५३ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर मुंबईने ५० हजारांचा टप्पा ओलांडला

News Desk