HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज अंतिम निकाल, सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष

मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज (५ मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण वैध ठरवण्याबाबत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी १०.३० वाजता सुनावणी सुरु होईल. सर्वोच्च न्यायालयाने २६ मार्चला निकाल राखून ठेवला होता. अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती.

मराठा आरक्षणाच्या बाजूनेच हा निकाल लागेल याबाबत आपण पूर्ण आशावादी आहोत, असं मत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडलं आहे. सर्व संविधानिक प्रक्रिया पूर्ण करुनही याबाबतच्या सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात चांगले आणि निष्णात वकिलांनी युक्तीवाद केला आहे. मराठा आरक्षण हे कसं योग्य आहे, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देणं हे कसं बरोबर आहे, या सर्व मुद्द्यांमध्ये कुठलीही उणीव राहिलेली नाही, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जींनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्याविरोधात दुसरी FIR दाखल

News Desk

वाजपेयींच्या निधनाच्या तारखेबाबत संभ्रम | संजय राऊत

Gauri Tilekar