HW News Marathi
देश / विदेश

मराठा आरक्षणावर आजपासूनच सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाची सुनावणी आजपासून (२० जानेवारी) होणार आहे. २५ जानेवारीपासून पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार होती. पण, आजच घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार का हे पाहण्याचे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२०डिसेंबर २०२० रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती.अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्‍वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे ही सुनावणी झाली होती.

यावेळी मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला होता. ‘शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. नोकरीमध्ये देखील आरक्षण देण्याची गरज असून वर्तमान परिस्थिती बघता मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचं मुकुल रोहतगी यांनी सांगितले.

तर ‘EWS ला १० टक्के आरक्षण देण्यात आले पण हाच समसमान हा न्याय मराठा समाजाला का नाही. आताच्या लोकसंख्येनुसार विचार करण्याची आवश्यकता आहे’, असा युक्तीवाद कपील सिब्बल यांनी केला होता.

सर्व युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी आपल्या निर्णयात नमूद केले की, मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची सुनावणी २५ जानेवारी २०२१ पासून सुरू होईल.’ तसंच, घटनेत १०२ व्या घटना दुरुस्तीचा प्रश्न असल्याने न्यायालयाने अ‍ॅटर्नी जनरल यांना नोटीस बजावली होती. न्यायालयाने वकिलांना लेखी युक्तीवाद सादर करण्यास सांगितले होते. परंतु, या घटनापीठापुढे आजपासूनच सुनावणी सुरू होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगातील पहिल्या डिझायनर बाळाचा जन्म, चिनी शास्त्रज्ञांचा अनोख्या प्रयोगाचा दावा

News Desk

शिवराजसिंह चौहान यांनी चौथ्यांदा घेतली मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

News Desk

अण्णा हजारे यांचे उपोषण मागे

News Desk