HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

अनिल देशमुखयांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, धक्का मिळणार की दिलासा?

नवी दिल्ली | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज (८ एप्रिल) सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर अनिल देशमुख यांचं राजकीय भवितव्य ठरण्याची शक्यता असल्याने सुप्रीम कोर्टात नेमकं काय होतं, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्टात अनिल देशमुख यांना धक्का बसणार की त्यांच्या बाजूने कोर्ट निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयची चौकशी करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाच्या विरोधात अनिल देशमुख यांनी व्यक्तिगत स्तरावर सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे.

परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी महाराष्ट्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबई हाय कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतरच अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण राजीनामा देत असल्याचं त्यावेळी देशमुख यांनी सांगितलं होतं.

सचिन वाझेने घेतलं आणखी एका मंत्र्याचं नाव

सचिन वाझे प्रकरणात ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचं नाव आल्याने खळबळ उडाली आहे. NIA कोर्टात सचिन वाझे याने एक पत्र दिलं असून यामध्ये शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर वसुलीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. मात्र अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून कोणत्याही चौकशीला तयार असल्याचं म्हटलं आहे.

Related posts

विठुमाऊलीप्रमाणे लालपरीसुद्धा भाविकांच्या ह्रदयात आहे, सतेज पाटलांचं भाजपला प्रत्युत्तर !

News Desk

साताऱ्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

News Desk

देशातील इंधन दरवाढीला लगाम बसण्याची चिन्हे नाहीच

Gauri Tilekar