मुंबई | शहरात आणि उपनगरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामुळे शहरतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले तर मालाड येथे भिंत कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या आगमनाने पालिकेने केलेल्या नालेसफाईचे सर्व दावे फोल ठरले आहेत. पालिकेवर सर्व स्तरातून टीका होत असताना मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेची पाठराखण केली आहे. हायटाईड असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होते असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पुढे असे देखील म्हणाले की, पुढील ३ ते ४ दिवस मुंबईला धोका असून सर्व यंत्रणा हायअलर्टवर असल्याचे माहिती प्रसार माध्यमांशी दिली.
Maharashtra CM: High tide is expected at 12 noon, we'll monitor the situation. Last night Mumbai police received 1600-1700 tweets from people, they received immediate help. BMC Disaster Mgmt worked entire night. Heavy rainfall is expected in next 2 days. We are prepared for it. pic.twitter.com/eRzKOWdkBW
— ANI (@ANI) July 2, 2019
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत दिली आहे तसेच महापालिकेनेही ५ लाख द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी देण्यात आल्याचे सांगितले. आज (२ जुलै) सकाळपासून ३ ते ४ तासात जोरदार पाऊस पडला आहे. महापालिका प्रशासन रात्रभर काम करत आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट, पोलीस प्रशासन सर्वजण अहोरात्र काम करत आहे.
Maha CM: There was heavy rainfall in Mumbai last night which led to accidents. In Malad, wall collapsed&at least 13 died, 30-40 injured.I met them. Local trains operational on Western line but yet to resume on Central line as there's more flooding there. Work on to pump out water pic.twitter.com/lbgEIJ8wSB
— ANI (@ANI) July 2, 2019
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सरकारी आणि खासगी शाळांना सुट्ट्या दिल्या असून हायटाईडमध्ये पाऊस आल्यास मुंबई आणखी तुंबण्याची भीती देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. याची खबरदारी म्हणून सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. पोलीस काल (१ जुलै) रात्रभर कार्यरत आहेत. मध्य रेल्वे सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पम्पिंग स्टेशनच्या माध्यमातून पाणी उपसा सुरू करून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज शताब्दी रुग्णालयाला भेट देऊन मालाड दुर्घटनेच्या जखमींची विचारपूस केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.