HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांचा शिवसेनेला टोला ‘करून दाखवले’

मुंबई | शहर आणि उपनगरात सोमवार (१ जुलै) रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांच्या तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर सर्वसामन्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी साचले आहे. मलिक यांनी त्यांच्या घरात पाण्यामुळे काय अवस्था झाली सांगणारी पोस्ट त्यांनी ट्वीटरवरून शेअर केली आहे. मलिक यांनी शिवसेनेने करून दाखवले असा टोला हलणला आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मलिक यांच्या घरात देखील पाणी साचले असून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याचे फोटो पोस्ट केली आहेत. आपल्या घरातील आणि घराबाहेर साचलेल्या पाण्याचे फोटो त्यांनी शेयर केली आहेत. या फोटला त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘करून दाखवले’ अशी कॅप्शन देऊन सरळसरळ शिवसेनेला टोला लगावला आहे.

मलिक यांनी ट्वीटरवर शेअर केलेल्या फोटोत त्यांच्या घरचा किचन आणि घरातील इतर खोल्यांमध्ये पाणी साचलेले चित्र दिसत आहेत. याचवेळी मलिक यांनी ‘धन्यवाद मुंबई महानगरपालिका’ असे म्हणत पालिकेवर देखील निशाना साधला आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच… जयंतरावांचं अचूक नियोजन, भाजपचा टप्प्यात कार्यक्रम !

News Desk

“त्यांना अक्कलेचे धडे मिळाले”, नाव न घेता नारायण राणेंचा अजित पवारांना टोला

Aprna

काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ट्विटवर माणिकराव ठाकरेंनी दिली ही प्रतिक्रिया 

News Desk