HW News Marathi
Covid-19

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण 

नाशिक | राज्यात सामान्य लोकांना तर कोरोनाची लागण होताना दिसत आहेच मात्र नेत्यांना देखील लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. गोडसे यांनी आपल्या ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली. गोडसे हे नाशिक मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करत याबद्दल माहिती दिली.

“आज माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकीय सल्ल्याने आवश्यकता असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी.! असे आवाहन हेमंत गोडसे यांनी केले आहे.मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरु ठेवेन आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन. तुम्ही स्वतःची काळजी घ्या !” असेही गोडसे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

“आता कोरोनासोबत जगणे स्वीकारले पाहिजे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जिल्ह्याचा कोरोनाचा आलेख वाढत असताना मतदारसंघातील विकास कामे, शासकीय बैठका तसेच मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी देणे गरजेचे असल्याने माझे काम सुरु होते.” अशी माहितीही गोडसेंनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभरात आतापर्यंत ४८ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग, तर १८ लाखांहून अधिक कोरोनामुक्त

News Desk

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांची घेतली भेट..

Arati More

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राकडून ‘गरीब कल्याण रोजगार योजना’, २५ हजार मजुरांना मिळणार लाभ

News Desk