HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्ह्यात सव्वा कोटी रुपयांचा‌ 47 पोती गांजा जप्त‌; चौघे‌ तस्कर फरार

कळंब (उस्मानाबाद) | उदय साबळे पाटील

कळंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत तालुक्यातील मस्सा (खंडेश्वरी) शिवारात कडब्याच्या गंजीत दडवून ठेवलेला पांढऱ्या रंगाची प्लास्टिकचे सुमारे 47 पोते गांजा सुमारे सव्वाकोटी रुपये किमतीचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार (ता.३१) धाड टाकून सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पकडला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने व त्यांच्या टीमने यांनी ही धाडसी कारवाही केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मस्सा शिवारात कडब्याच्या गंजीत विक्री साठी गाज्यांची पोती ठेवली असल्याची गुप्त माहिती मिळाली मा.पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन,अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक माने यांच्या टीमने मस्सा शिवारात बालाजी काळे यांनी शेतातील कडब्याच्या गंजीत दडवून ठेवलेला पांढऱ्या रंगाची प्लास्टिकची 47 पोती ,एकुण 1132.66 किलोग्राम वजनाचा गांजा एकूण किंमत 1,24,59,260 (एक कोटी 24 लाख 59 हजार 260 रुपये किंमतीचा गांजा पकडला आहे

पोलिस येणार असल्याचा सुगावा लागताच बालाजी काळे व इतर तिघेजण फरार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही धाडसी कारवाही केली आहे. गांज्याची पोती जप्त करून कळंब पोलिस ठाण्यात रात्री आठ वाजेच्या दरम्यान आणण्यात‌ आली व आरोपींविरोधात एन.डी.पी.एस. कलम 20(b)(ii), 29 प्रमाणे पोस्टे कळंब गुरनं.187/2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या कारवाईसाठी पोलीस पथक

*टिम:-* मा.पो.नि.श्री.घाडगे साहेब, सपोनि निलंगेकर, पोउपनि माने, पोहेकॉ/218 जगदाळे, पोहेकॉ/ठाकुर, पोना/12 घुगे, पोना/1166 सय्यद, पोना/1569 चव्हाण, पोकॉ/1611 जाधवर, पोकॉ/1631 ढगारे, पोकॉ/1776 मरलापल्ले चा.पोना/583 चोरे, चा.पोकॉ/1424 माने

सर्व नेम. स्था. गु.शा. उस्मानाबाद

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? – जयंत पाटील

Aprna

“पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल”, पंकजा मुंडेंचे विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर मोठे विधान

Aprna

जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल तर…

News Desk