HW News Marathi
महाराष्ट्र

लिपिक पदाच्या परीक्षेत हायटेक कॉपी, एक लाख रुपये मोजले

औरंगाबादः महावितरणमध्ये लिपिक भरतीसाठी रविवारी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा पेपर फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्वारीच्या दाण्याच्या आकारासारख्या इअरफोनच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे पुरवली जात होती. पोलिसांनी या ‘हायटेक’ टोळीतील चौघांना अटक केली. जीवन गिरजाराम जघाळे (२१), नीलेश कपूरसिंग जोनवाल (२३), पवन कचरू बहुरे (२२), दत्ता कडुबा नलावडे (२२) अशी आरोपींची नावे आहेत. पेपर सोडवण्यास मदत व ती उत्तीर्ण करून देण्यासाठी काही परीक्षार्थींशी ५ ते ८ लाख रुपयांचा व्यवहार या टोळीने ठरवल्याचेही चौकशीतून स्पष्ट होत आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जयभवानीनगर येथील परीक्षार्थीला एका तरुणाने महावितरण परीक्षेत पास करण्यासाठी १ लाख रुपये घेऊन प्रश्नपत्रिका हायटेक पद्धतीने सोडवण्यास मदत करण्यासाठी संपर्क साधला होता. ही गुप्त माहिती मुकुंदवाडी परिसरातील एका विशेष पोलिस अधिकाऱ्याला मिळाली. त्या आधारे पोलिसांनी रविवारी सांयकाळी पाचच्या सुमारास सापळा रचून आरोपींना अटक केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथराव खडसे व रोहिणीताईं पासून माझ्या जीवाला धोका; शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

Aprna

महाराष्ट्रात उर्दू माध्यमांच्या शाळा १८ जूनला सुरू होणार

News Desk

सध्या फोटोचे राजकारण सुरू म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला टोला!

Seema Adhe