HW News Marathi
महाराष्ट्र

मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे MMRDA ला आदेश

मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. तसेच तूर्तास भूखंडाची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर आज (१६ डिसेंबर) राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे. कांजूरमार्गच्या जागेवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारनंही दावा ठोकला आहे. हाच वाद आता हायकोर्टात गेला आहे. आज या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यानंतर कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश हायकोर्टाच्या वतीने एमएमआरडीएला देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संजय राऊतांचं असंय, खातात शिवसेनेचं पण निष्ठा शरद पवारांवर’ – गोपीचंद पडळकर

News Desk

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानला NCBकडून क्लिनचीट

Aprna

राज्यात कोरोना बाधितांची संख्या २८०१, आज ११७ नव्या रुग्णांची नोंद

News Desk