HW News Marathi
महाराष्ट्र

डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची महापालिकेला नोटीस

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात डॉक्टर अमरापूरकर बेपत्ता झाले होते. डॉ अमरापूरकर यांचा मृतदेह गुरूवारी वरळी येथे समुद्र किणारी सापडाला होता. याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने महापालिका व सरकारी यंत्रणांना नोटीस दिली आहे. या नोटीला दोन अठवड्यात उतर देण्याचे निर्देश कोर्टाने संबंधीत यंत्रणांना दिले आहेत.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे डॉ. अमरापूरकर हे मॅनहोलमध्ये पडले. त्यामुळे महापालिकेविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आणि अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली आणि त्यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. शिवाय अमरापूरकर कुटुंबीयांना वाटत असेल तर ते महापालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात. तशी त्यांना मुभा आहे, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रश्न विचारणे सोपे असते, त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Aprna

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा सुरुंग, १० नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन!

News Desk

नगरसेवकांना प्रवासासाठी मिळणार हेलिकॉप्टर ? 

News Desk