HW News Marathi
मुंबई

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर दिवसाकालीन ब्लॉक रद्द

मुंबई | मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल-दुरुस्तीच्या कारणास्तव दोन्ही मार्गावर आज (५ मे) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावर सकाळी १०.५४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. यावेळी सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल कल्याण ते ठाणे स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरून वळविण्यात येणार आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएटी) कल्याण दिशेकडे जाणाऱ्या लोकल आज सकाळी १०.१६ ते दुपारी ३.२२ वाजेपर्यंत नियोजित थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा या स्थानकावर थांबणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस २० ते ३० मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्ग

हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही मार्गांवर आज सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी दरम्यान दोन्ही मार्गांवरून एकही लोकल धावणार नाही. सकाळी १०.३४ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत मिनिटांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत लोकदरम्यान पनवेल ते मानखुर्द विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनकाडून सांगण्यात आले आहे.

प्रवास करण्यांना सवलत

हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनानुसार या प्रवाशांना त्यांच्या त्याचा तिकीट किंवा पासवर आज ब्लॉकच्यादरम्यान सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम मार्गावर दिवसकालीन ब्लॉक रद्द

पश्चिम रेल्वे मार्गावर आज (५ मे) रात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान ब्लॉक असेल. मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते पहाटे ४ वाजेपर्यंत वसई रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर साडेतीन तासांचा जम्बो ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावर ५ मे रोजी दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला होता. यासह वांद्रे स्थानकावर गर्डर हटविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे आज (५ मे) रोजी मध्यरात्री ११ वाजता हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून अंधेरीकडे रात्री १० वाजून १२ मिनिटांपासून, तर काल (४ मे) रोजी वांद्रे, अंधेरी, गोरेगावहून सीएसएमटी दिशेकडे रात्री १० वाजून ३८ मिनिटांपासून सकाळी ५ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्नदात्याच्या मदतीला अन्नदुत धावला

News Desk

सराईत गुन्हेगार पप्पू सातपुतेची हत्या

News Desk

मुंबईतील शेतकऱ्यांची यादी शासनाकडे नाही

News Desk