HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंना हायकोर्टाचा दणका ,सुनावणी उद्याच !

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्यावर त्यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. न्यायालयाचे अधिकृत तास संपल्याने आज याचिका दाखल केली जाऊ शकत नाही, असे त्यांचे वकील सांगतात. राणे यांची याचिका उद्या तातडीने सुनावणीसाठी दाखल केली जाईल.

कोर्टाने अर्ज फेटाळला

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याची मागणी शिवनेने केली होती. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात अपशब्द काढल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नारायण राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने ती आता फेटाळला आहे. रत्नागिरी कोर्टात दाखल केलेला अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहेत. त्यामुळे नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई अटक आहे. मात्र नारायण राणे यांनी रत्नागिरी कोर्टाच्या निकालाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल

नारायण राणे यांच्यावर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तसेच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कोरोना प्रतिबंधक कायद्याअतंर्गत आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय ताडफळे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह शंभर ते सव्वाशे कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती

नारायण राणे यांना अटक करण्यात अली आहे. मात्र, त्यांची प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे तसेच रक्तदाबाचे प्रमाण वाढले आहे. प्रकृती अस्वास्थायमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. सध्या त्यांना अटक झाली असली तरी डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली आहे.

सॅच्युरेशन नॉरमल आहे, बीपी वाढलेला आहे, वय पाहता बीपी वाढला आहे, ते डायबिटीजचे पेशंट आहेत, ईसीजी आणि अॅडमिशन आवश्यक आहे. बीपी वाढल्यामुळे राणेंना रुग्णालयात अॅडमिट करावं लागेल, त्यानंतर पुढील ट्रीटमेंट द्यावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर! पंढरपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Aprna

मराठा आरक्षणावर मंत्रालयात बैठक

News Desk

कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्राला आर्थिक सहकार्याची गरज

News Desk