मुंबई | महाराष्ट्र आणि गुजरातमधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत चालली आहे. देशात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राच पहिल्य क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांची पत्रकार परिषद पार पडली.
“दोन जिल्हे सर्वाधिक चिंतेचा विषय आहे जिथे रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात २८ हजार रुग्णांची नोंद झाली असून पंजाबमध्येही लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या जास्त आहे.” असं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं.“याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत.
गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत,” अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली.पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे”.
The top 10 districts where maximum active cases are concentrated are – Pune, Nagpur, Mumbai, Thane, Nashik, Aurangabad, Bengaluru Urban, Nanded, Jalgaon and Akola. Nine districts from Maharashtra and one fro, Karnataka: Union Health Secretary Rajesh Bhushan#COVID19 pic.twitter.com/xWneLDYb4I
— ANI (@ANI) March 24, 2021
दरम्यान, राज्यात काल (२३ मार्च) २८,६९९ कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १३,१६५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण २२,४७,४९५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २,३०,६४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८८.७३% झाले आहे.
Two states are of grave concern, that have shown a recent surge in cases – Maharashtra, that reported more than 28,000 cases in the last 24 hours and Punjab, that is reporting huge number of cases in proportion to its population: Union Health Secretary Rajesh Bhushan#COVID19 pic.twitter.com/8iAuj2tv4w
— ANI (@ANI) March 24, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.