मुंबई | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार ९६४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर देशात २४ तासात २६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची महिली घटना घडली आहे. तसेच एका दिवसत ११ हजार २६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता देशात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७३ हजार ७६३ रुग्ण वर पोहोचली आहे. त्यापैकी ४ हजार ९७१ जणांना आपले प्राण गमवले आहे. दरम्यान ८२ हजार ३७० जणा आतापर्यंत देशभरात कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Highest spike of 7,964 new #COVID19 cases and 265 deaths in the last 24 hours in India. Total number of cases in the country now at 1,73,763 including 86422 active cases, 82370 cured/discharged/migrated and 4971 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/990tyBfGPe
— ANI (@ANI) May 30, 2020
भारतात एप्रिल ते मे या एका महिन्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत जवळपास एक लाख ४० हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडाही वधारला आहे. मृतांची संख्या सुमारे ३ हजार ९०० ने वाढली आहे. देशात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२९ मे) दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.