HW News Marathi
महाराष्ट्र

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविरोधात भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ अटक

मुंबई। दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेविरोधात भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटकला पोलिसांनी अटक केले आहे. हिंदुस्थान भाऊला आज (१ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर करणार आहेत.

हिंदुस्थान भाऊविरोधात धारावी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी कलम ३५३, ३३२, ४२७, १०९, ११४, १४३, १४५, १४६, १४९, १८८, २६९, २७० भा द वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंग सह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 या कलमा अंतर्गत अटक करण्यात आली.

हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात त्याने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या नाही तर राज्यात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर मोठ्या संख्येने दहावी आणि बारावीचे विद्यार्थी काल (३१ जानेवारी) राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी या निवासस्थान बाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते. आणि विद्यार्थींनी शिक्षणमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विद्यार्थींवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ!

swarit

अनुसूचित जाती आरक्षण करीता महामेळावा

News Desk

जळगावमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण ,खानदेशात कोरोनाचा शिरकाव !

swarit