नागपूर । वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. पीडित तरुणीचा हृदयविकाराचा धक्का आल्याने आज (१० फेब्रुवारी) पहाटे ६ वाजून ५५ मिनिटाने तिची प्राणज्योत मालवली. पीडित तरुणीवर गेल्या दोन ते तीन वेळा शस्त्रक्रिया झाली. कालपासून तिची प्रकृची अतिशय खालावली होती. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन तिच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली.
Dr Anup Marar, Director, Orange City Hospital & Research Center, #Nagpur: The patient was declared dead at 6.55am today. The probable cause of death was Septicemic shock. Her body has been handed over to police authorities for postmortem. https://t.co/rJ1JbvppD5 pic.twitter.com/LwVaagCRpb
— ANI (@ANI) February 10, 2020
रक्तदाब तसेच हृदयाचे ठोके कमी झाले होते. श्वासोच्छवास घेण्यासही तिला त्रास होत होता. शिवाय काल (९ फेब्रुवारी) रात्रीपासून तिला दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले आणि त्यातच तिने प्राण सोडले. तिला आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत घोषित केल्याच डॉक्टरांनी सांगितले.
हिंगणघाट जळीतकांड कधी काय घडले?
२४ वर्षीय प्राध्यापिका तरुणी नेहमीप्रमाणे सोमवार (३ फेब्रुवारी) सकाळी कामावर निघाली असताना आरोपी विक्की नगराळेने तिचा पाठलाग केला. सकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील एका चौकात येताच आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती २० ते ३० टक्के भाजली होती. पीडितेला उपचारासाठी हिंगणघाट शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास तिला नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले. आरोपी विक्की नगराळे याला वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली. पीडित प्राध्यापिकेच्या सहकारी आणि विद्यार्थ्यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा, कारवाईची मागणी.
पीडितेला न्यायसाठी हिंगणघाट बंद’ची हाक
पीडितेला न्याय द्या, अशी मागणी करत मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय रस्त्यावर. हिंगणघाट शहरात मोर्चा, नराधम आरोपीचे एन्काऊण्टर करा किंवा त्याला फाशीची शिक्षा द्या, अशी जनसामान्यांची मागणी, सर्वपक्षीयांकडून ‘हिंगणघाट बंद’ हाक दिली होती. यादरम्यान, आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांकडून आरोपीचा पाच दिवसांचा रिमांड मागितला. न्यायालयाने आरोपीला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी गुप्तरित्या आरोपीला न्यायालयात हजर करत तातडीने रवानाही केले.
पीडितेच्या केसची सुनावणी फास्ट ट्रक कोर्टात चालवणार
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पीडित तरुणीची भेट घेतली. नॅशनल बर्न सेंटर मुंबईचे तज्ज्ञ डॉक्टर सुनील केसवानी हेदेखील यावेळी उपस्थित होते. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवणार, पीडितेचा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली, त्यामुळे उज्वल निकम यांची नियुक्ती करु, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती ट्वीट करत केली.
न्यायालायने आरोपीला १२ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली
आरोपीला शुक्रवारी (८ फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या वेळीच न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने घटनेनंतर नागरिकांमधील संताप लक्षात घेता रात्री १२.२५ वाजता या प्रकरणावर सुनावणी घेतली. आरोपी विक्की नगराळेला १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पीडित तरुणीचे प्रकृती दिवसेंदिवस खालवत होती.
पीडित तरुणी व्हेंटिलेटरवर
सातव्या दिवशी पीडितेची प्रकृती स्थिर पण नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तिच्यावर चौथ्यांदा ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर तिला आयसीयूत ठेवले. कृत्रिम फीडिंग सुरु होते, श्वास घेऊ शकत नसल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवले होते.
पीडितेची मृत्यूची अपयशी झुंज
पहाटे हृदयविकाराचा धक्का आल्याने पीडितेची प्रकृती खालावली होती. पीडित तरुणीचा हृदयविकाराचा धक्का आल्याने आज (१० फेब्रुवारी) पहाटे ६ वाजून ५५ मिनिटाने तिची प्राणज्योत मालवली. पीडित तरुणीवर गेल्या दोन ते तीन वेळा शस्त्रक्रिया झाली. कालपासून तिची प्रकृची अतिशय खालावली होती. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर उपचार करणारे डॉ. राजेश अटल यांनी मेडिकल बुलेटिन घेऊन तिच्या मृत्यूची दुःखद बातमी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.