HW News Marathi
देश / विदेश

देशातील प्रसिद्ध सांस्कृतिक स्मारके ६ जुलैपासून खुली केली जाणार?

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. रुग्णांची संख्या आता ६ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी देशात काही महिने लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व गोष्टी, पर्यटन स्थळ, प्रसिद्ध स्मारके सगळं काही बंद होतं. आता सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, यानुसार येत्या 6६ जुलैपासून देशातील स्मारके संपूर्ण काळजी घेत खुली केली जाऊ शकतात. अशी माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्विटरवरून दिली.

प्रल्हाद सिंह पटेल यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, सर्व स्मारके येत्या ६ जुलै पासून खुली केली जाऊ शकतात. संपूर्ण सुरक्षेत ही स्मारकं खुली केली जाऊ शकतात. कोरोनापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण तयारी केली जाणार आणि त्यानुसारच निर्देश दिले जाणार आहेत. खबरदारी म्हणून काही नियम तयार केले जाणार आहेत आणि ते पर्यटकांना पाळणे अनिवार्य असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर्मनीने असे काय केले ज्याने कोरोनामूळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले?

swarit

अलिगढ विमानतळाचं नाव बदलणार? योगी आदित्यनाथ म्हणाले…..

News Desk

युद्ध नाही तर चर्चेच्या मार्गानेच काश्मीर प्रश्न मार्गी लागेल !

News Desk