HW News Marathi
महाराष्ट्र

गृह विभागाकडून IPS सौरभ त्रिपाठींच्या निलंबनाचे आदेश

मुंबई | मुंबईतील अंगडिया व्यापाऱ्यांकडून झालेल्या कथित वसुलीप्रकरणी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबिनाचे आदेश देण्यात आले आहेत. त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृहखात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी केली होती. आता सौरभ त्रिपाठी यांचा गृहविभागाने पाठवलेला निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य केला आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव वेंकटेश भट यांनी काढलेल्या शासन निर्णयानंतर निलंबनावर शिक्कामोर्तब झाला आहे.

मुंबई पोलिसांनी या वसुली प्रकरणाची माहिती गृहमंत्रालयाला दिली होती. त्रिपाठी यांच्या विरोधात भक्कम पुरावे सापडले असून त्यांच्यावर विभागीय कारवाई करावी, हेही स्पष्ट केले होते. तक्रारदाराला फोन करून तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचा आरोपही त्रिपाठी यांच्यावर आहेत.

मुंबई पोलिसात कार्यरत आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर खंडणीचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम होती. त्यानंतर त्यांनी अटकेपासून बचाव करण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपाठी यांनी आपल्या अटकपूर्व जामीन अर्जात असे म्हंटले होते की यापूर्वीच्या एफआयआरमध्ये त्यांच नाव नव्हते आणि पोलीस ठाण्याच्या पातळीवर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात होते याची त्यांना माहिती नव्हती. त्रिपाठी यांच्या याचिकेवर आता 23 तारखेला कोर्टात सुनावणी होणार असून त्यानंतर त्रिपाठी यांना अटकेपासून दिलासा द्यायचा की नाही, याचा निर्णय न्यायालायच घेऊ शकतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार भारत भालके यांच्या भेटीसाठी शरद पवार रूग्णालयात 

News Desk

मराठा आरक्षणासाठी आज संभाजीराजे आधी फडणवीस मग उद्धव ठाकरेंची घेणार भेट !

News Desk

राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावे: आठवले

News Desk