HW News Marathi
महाराष्ट्र

गृहमंत्री अनिल देशमुख गुन्हेगारांच्या गराड्यात,औरंगाबाद दौऱ्याचा एक फोटो झाला वायरल

औरंगाबाद | राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पोलिसांना अनेक सूचना वेळोवेळी देत असतात. पण दुसरीकडे गृहमंत्र्यांसोबत काही गुन्हेगारांनी फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. या प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाष्य केले आहे. टीव्ही ९ मराठीशी बोलताना ते म्हणाले की, “दौऱ्यावर असताना खुप लोकं भेटायला येतात निवेदन देतात. त्यांची पार्श्वभूमी काय असते ती माहित नसते.पण याची काळजी घेऊ”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.

राज्याचे गृह मंत्री यांचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत गृहमंत्र्याचे शेजारी उभ्या असलेल्या या तिघांवर ही गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकाने ५०० ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे तर दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे तर अन्य एकावर ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

तिन्ही गुन्हेगार माजी नगरसेवक

कलाम कुरेशी आणि जफर बिल्डर हे एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत, तर सय्यद मतीनही नगरसेवक पदावर होता. जफर बिल्डर आणि सय्यद मतीन यांनी औरंगाबाद महापालिकेत गोंधळ घालून महापौरांवर खुर्च्या फेकल्या होत्या. सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे.

अनिल देशमुख ४ दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गुन्हेगारांसोबत गृहमंत्र्यांचा फोटो समोर आल्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

कोण आहेत हे गुन्हेगार?

कलीम कुरेशी – गुटखा किंग म्हणून याची ओळख आहे. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये देखील याची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

सय्यद मतीन – याच्यावर बलात्कारासह अन्य गुन्हे दाखल आहे. तसंच तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित आहे.

जफर बिल्डर– याच्यावर 500 ट्रक चोरून सुटे भाग करून विकणाऱ्या टोळीतला हा गुन्हेगार आहे.

विशेष म्हणजे, यातील सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे तो बराचकाळ जेलमध्ये होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील पोलीस हातकड्या घालून हजेरी लावत होते. धक्कादायक म्हणजे, यातील दोन जण एमआयए चे माजी नगरसेवक आहे. सर सय्यद मतीन याची एमआयएम पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे हिंदुत्व हे भेंडीबाजारातले; सामनाच्या अग्रलेखावरून नितेश राणेंची टीका

Aprna

राज्याचे मुख्यमंत्री लवकरच बदलणार

News Desk

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मार्केटमध्ये हापूस दाखल

swarit