HW News Marathi
महाराष्ट्र

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अभ्यास करुन त्यावर प्रतिक्रिया देऊ – गृहमंत्री

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यामूळे महाराष्ट्र सरकारला आणि मुंबई पोलिसांना याचा झटका लागला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणाले की, सुप्रीम कोर्टात निकाल आला आहे. त्या निकालाचे कॉपी मिळाल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास करु आणि मग मी माझी प्रतिक्रिया देईन, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे. तसेच त्यांनी ट्विटदेखील केले आहे. तसेच, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक आणि स्वागत केले जात आहे. आणि लवकरच सुशांतला न्याय मिळावा अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी सर्व पुरावे सीबीआयकडे सुपुर्द करावे असे निर्देशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्री जयंत पाटील यांची लाँग ड्राईव्ह आणि युवा टीमशी चर्चा… मध्यरात्री स्वतःच स्टिअरिंग हातात घेत केला प्रवास !

News Desk

महाविकास आघाडी सरकारच्या पूर्ण मंत्रिमंडळ मध्ये एकाही मंत्र्यंत ओबीसी च्या मुद्यावर राजीनामा देण्याची हिम्मत नाही…..प्रीतम मुंडे

Ruchita Chowdhary

जाणून घ्या… सुब्रमण्यम स्वामींच्या ‘मातोश्री’ भेटीमागचे कारण

News Desk