मुंबई | राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यावरून त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. आव्हाडांनी भिवंडतील धामणकरनाका परिसरातील धोबीतलाब येथील स्व. परशुराम टावरे स्टेडियम येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
#WATCH Jitendra Awhad,NCP in Thane:Main Delhi ke takht se poochta hoon,ab tu maangega mujhse saboot mere deshvasi hone ka?Toh sun,jab tera baap sar jhukakar angrezon ke talwe chaat raha tha,tab mera baap phansi ke takht ko choomke inquilab zindabad ke naare laga raha tha.(18.01) pic.twitter.com/WOwKP167xQ
— ANI (@ANI) January 20, 2020
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मी दिल्लीच्या तख्ताला विचारु इच्छितो, तुम्ही आमच्याकडे देशातील नागरिक असल्याचे पुरावे मागणार का?, मग ऐक, जेव्हा तुमचा बाप मान झुकवून इंग्रजांचे तळवे चाटत होता. तेव्हा माझा मान झुकवून इंग्रजांचे तळवे चाटत होता, तेव्हा माझा बाप फास गळ्यात अडकवून इन्कलाब जिंदाबाद,” असे नारे त्यांनी व्यासपीठावरून दिले. आव्हाडांच्या भाषणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए)वर देशभरातील ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन होत आहेत. हा कायदा जोपर्यंत मागे घेणार नाही, पर्यंत आंदोनल मागे घेणार नाही, असा पवित्रा आव्हाडांनी या कार्यक्रमात केला आहे. या कायद्याला विरोध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील प्रत्येक चौकाचौकांत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून या कायद्याला आपला विरोध दर्शविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.