HW News Marathi
Covid-19

मुंबईत आता होम क्वारंटाइन बंद, आयुक्तांनी दिले आदेश

मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एका कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. विदर्भात रुग्णवाढीचा वेग मोठा असला तरी गेल्या दोन-तीन दिवसांत मुंबईतचे रुग्णही वाढू लागले आहेत. याची दखल घेत मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी नवे नियम जाहीर केले. त्यात भर घालत महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज काही मोठे निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार इथून पुढे मुंबईत घरातलं विलगीकरण किंवा होम क्वारंटाइन बंद करण्यात आलं आहे.

यापुढे लक्षण विरहित लोकांनासुद्धा होम क्वारंटाइन करणार नाही. प्रत्येकाला कोविड सेंटरमध्ये जावंच लागेल, असं महापौरांनी स्पष्ट केलं. सर्व सार्वजनिक कार्यक्रम आजपासून बंद करत असल्याचही महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केलं. लग्न समारंभात अनुमतीप्राप्त संख्येपेक्षा अधिक माणसं दिसली तर कारवाई होईल. कुणीही सोशल डिस्टन्सिंगचे किंवा मास्क वापरण्याचे नियम मोडले तर दंडात्मक कारवाई होईल, असे मुंबईच्या आयुक्तांनी जाहीर केलं आहे.

मुंबईचे आयुक्त इब्बालसिंग चहल यांनी दिलेल्या नियमांच्या यादीत वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत, असं म्हटलं होतं. पण त्यापुढे जात महापौरांनी पत्रकार परिषदेत मुंबईत होम क्वारंटाइन नाहीच, असं जाहीर केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आता सात दिवसांचा ‘होम क्वारंटाईन’

Aprna

भाजपचा आमदार फुटला अन् एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटू नये !

News Desk

१८ वर्षावरील नागरिकांना मोफत लसीचं गिफ्ट मिळणार? अजित पवार म्हणतात…

News Desk