HW News Marathi
Covid-19

८ तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं, केंद्र सरकारने जारी केली Home Quarantine साठी नवी नियमावली

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेच. मृत्यूचं प्रमाणही हवं तसं कमी होताना दिसत नाही आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढत चालली आहे. त्यात रेमडेसिविर, ऑक्सिजन, औषधे या सगळ्यांचा तुडवडा जाणवत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारने होम क्वॉरंटाईन असलेल्यांसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली असून, त्यातील १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख ४६ हजार ११६ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३७ लाख ४५ हजार २३७ इतकी आहे.

गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो लोकांना प्राण गमावावे लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली जारी केली आहे.

काय आहे नियमावली?

१. गृह विलगीकरणातील रुग्णासाठी खोलीली संलग्न- स्वतंत्र स्नानगृहाची सुविधा पाहिजे.

२. इतर आजार आणि वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणाची परवानगी द्यावी.

३. रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालयाबरोबर नियमित संपर्क असावा.

४. विलगीकरणात पूर्णवेळ रुग्णांची काळजी घेणारी व्यक्ती असावी.

५. रुग्ण राहत असलेल्या खोलीत भरपूर हवा खेळती राहिली पाहिजे.

६. रुग्णांनी घरात असतानाही तीन पदरी वैद्यकीय मास्क वापरला पाहिजे. ८ तासांनंतर हा मास्क बदलणे आवश्यक असणार आहे.

७. रुग्ण राहत असलेल्या खोलीतील टेबलचा सरफेस, दाराच्या कड्या, हँडल यासारख्या गोष्टी फिनाईलने स्वच्छ करणे गरजेचं असणार आहे.

८. गृह विलगीकरणात १० दिवस राहिल्यानंतर रुग्णाला कोणताही त्रास नसल्यास रुग्णाचे विलगीकरण संपले.

९.रुग्णांची काळजी घेणारी व्यक्ती हायड्रोक्सीक्लोरोक्वीन घेऊ शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र-राज्य सरकारला ‘कोरोना’शी लढण्यासाठी सचिन तेंडुलकरकडून आर्थिक मदत

swarit

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे; नववर्षापासून नवीन संकल्प करुयात ! – मुख्यमंत्री

Aprna

कोल्हापुरात व्यापार होणार सुरु, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

News Desk