HW News Marathi
Covid-19

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास खा डार्क चॉकलेट, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिला सल्ला

नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांचा आकडा ३ ते ४ लाखांच्या मध्ये रोज वाढत आहेच. गेल्या २४ तासांत मात्र हा आकडा ४ लाखांच्या खाली आला आहे. कोरोनाच्या तणावातून सगळेच जात आहेत. अशात एक अनोखा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी दिला आहे. कोरोना संसर्गाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिला आहे. कोरोना झालेल्यांनी काय काय खावे याची पूर्ण लिस्टच हर्षवर्धन यांनी जारी केली आहे.

तुमचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या. योग करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहार घ्या. त्यामुळे कोविडचा सामना करण्यास मदत मिळेल, असं हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.

डार्क चॉकलेटमध्ये ७० टक्के कोको कंटेन्ट असतो. त्यामुळे कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते, म्हणून डार्क चॉकलेट खा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. हर्षवर्धन यांनी हा सल्ला दिल्यानंतर पुण्यात आणि भोपाळमध्ये संशोधन करणारे अनंत भान डार्क चॉकलेट खाल्ल्याने कोरोनाच्या स्ट्रेसवर मात करता येते याला आधार काय? असा सवाल केला आहे. डार्क चॉकलेट घेणं किती लोकांना परवडणार आहे?, असा सवालही भान यांनी केला आहे.

हर्षवर्धन यांनी डार्क चॉकलेटसह अन्य पदार्थांची यादीही दिली असून त्यातून इम्युनिटी पॉवर वाढत असून स्ट्रेसही कमी होत असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी शरीरात अधिकाधिक व्हिटॅमिन जाण्यासाठी भाजीपाला आणि फळांचं सेवन वाढवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोरोना’मुळे आता बायोमेट्रिक पद्धत रद्द होणार ?

News Desk

राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या १०३, तर प्रति दशलक्ष चाचण्यांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

News Desk

महाराष्ट्र दिनी राज्यातील कोरोना रुग्णांना मोफत उपचार करण्याच्या घोषणेचा राज्य सरकारला विसर

News Desk