HW News Marathi
Covid-19

होरायझन प्राईम हॉस्पिटलची कोविड रुग्णालयाची मान्यता रद्द, अवाजवी बील आकरल्याने पालिकेचा दणका !

ठाणे | कोरोना रुग्णांना रुग्णालय अवाजवी बील देण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा एका रुग्णालयाची कोविड रुग्णालय असलेली मान्यता काढून घेण्यात आली आहे. ठाण्यातील होरायझन प्राईम हॉस्पिटल, घोडबंदर रोड या रुग्णालयाची कोवीड रूग्णालय म्हणून घोषित केलेली मान्यता रद्द करण्यात आली आहे.अवाजवी बिल देणाऱ्या या खासगी रुग्णालयाला ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी दणका दिला आहे. त्यासोबत रूग्णालयाची नोंदणी देखील एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आली आहे.

कोविड-19 च्या हॉस्पिटलचा दर्जा असलेल्या हॉस्पिटल्सना सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार रुग्णांना बिल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील अनेक रुग्णालयांनी अवाजवी बिल आकारण्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या होत्या. त्यावर उपाय म्हणून ठाण्याच्या आयुक्तांनी मुख्य लेखा परीक्षकांच्या अधिपत्याखाली एका पथकाची स्थापना करून सर्व रुग्णालयांची चौकशी सुरू केली.

मुख्य लेखा परीक्षक यांच्या अधिपत्याखाली पथकाने केलेल्या तपासणीत १५ वेगवेगळ्या कोविड-19 च्या हॉस्पिटलमधील १७५२ देयकांची तपासणी करण्यात आल्या. त्यापैकी ४८६ देयकांची या पथकाने तपासणी करून एकूण १९६ आक्षेपित देयकांची नोंद या पथकाने केली. त्या एकूण १९६ आक्षेपित देयकांची रक्कम ही २७ लाखांपेक्षा जास्त होती. त्यामुळे या रुग्णालयांना आता नोटीस बजावण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन हवा – महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

केंद्राने दिलेली मदत अजून राज्यात आलेली नाही !

News Desk

“कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला भाजप कारणीभूत ठरणार”- नवाब मलिक

News Desk