HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यात हाॅटेल्स आणि लाॅज लवकरचं सुरू करण्याचा विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात मिशन बिगिन अगेन आणि अनलाॅक होत असताना अनेक उद्योग सुरू करण्यात आले आहेत. आता लवकरचं हाॅटेल्स सुरू करण्याविषयी सरकार विचाराधीन आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हाॅटेल उद्योग परत कसा सुरु करता येईल, यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

मुख्यमंत्री आणि हॉटेल्स असोसिएशनच्या बैठकीत हे महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले.

– महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसाय सुरु करण्याबद्दल लवकरच निर्णय होणार असून  हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी एक कार्यपद्धती निश्चित केली आहे
– लवकर ही कार्यपद्धती जाहीर केली जाणार
– पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान
हॉटेल्स आणि लॉज सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल.
-हॉटेल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी करावी लागेल.
-एका कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीमुळे हॉटेलमधील सर्व कर्मचारी आजारी पडू शकतात.
-हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही.
मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागेल.
– स्थानिक जे कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका.
-कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत याची काळजी घ्यावी
-स्वयंशिस्तही महत्वाची

Related posts

आता तर मोदी सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत, राऊतांचा मोदींना उपरोधिक टोला

News Desk

#Vidhansabha2019 : येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू | मुख्यमंत्री

News Desk

बॉलीवूड अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

News Desk