HW News Marathi
महाराष्ट्र

शाळेत गैरहजर असलेल्या डिसले गुरुजींनी शाळांचा दर्जा कसा उंचावला?, शिक्षणाधिकाऱ्यांचा आरोप

कोल्हापूर | ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले गुरुजी म्हणजेच शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तिथे जाण्यासाठी डिसले यांना रजा हवी आहे. त्यासाठी त्यांनी शिक्षण विभागाकडे अर्जही केला आहे. मात्र, रजा मंजूर होत नसल्याने ते राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तर शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी डिसले गुरुजी यांना नियुक्ती दिलेल्या शाळेत ते गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगितलं आहे.

डिसले यांनी अमेरिकेत पी.एच.डी. मिळविण्यासाठी रजेचा अर्ज केला आहे. परंतु, अर्ज करूनही रजा मंजूर होत नसल्यामुळे डिसले गुरुजींनी आपण नोकरी सोडण्याचा विचार करत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोहार म्हणाले, त्यांना नियुक्ती दिलेल्या शाळेत गैरहजर असलेल्या डिसले गुरुजींनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा उंचावला, असा सवाल लोहार यांनी उपस्थित केला आहे. परवानगीसाठी ते थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले. तसेच डिसले यांनी केवळ अर्ज दाखल केला आहे, तर त्या सोबतची कागदपत्रे त्यांनी जोडली नव्हती. योग्य प्रस्ताव आल्यास रजा द्यायला काही अडचण नाही, असं लोहार यांनी सांगितलं. तसेच योग्य कागदपत्रं न जोडता रजा मंजूर झाली नाही असं म्हणायचं याला काय अर्थ आहे? असा सवालही लोहार यांनी केलाआहे.

डिसले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले की, “मला अमेरिकेत शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्यामुळे तिथे जाण्यासाठी मला रजा हवी आहे. त्याकरिता मी शिक्षण विभागाकडे अर्जही केला आहे. मात्र, तरीही रजा मंजूर होत नसल्याने जिल्हा परिषद शिक्षक नोकरीचा राजीनामा देण्याची मनस्थिती आहे”, असं डिसलेंनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागासवर्ग आयोगाने वानखेडेंची चौकशी करणारी एसआयटी रद्द करण्याचे दिले आदेश

Aprna

‘पर्यावरण बचाना अपने हाथ में है भिडू’, जॅकी श्रॉफ यांनी राजभवनावर घेतली राज्यपालांची भेट

Manasi Devkar

शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानसभेच्या उपसभापतीपदी निवड

News Desk