HW Marathi
HW एक्सक्लुसिव कोरोना देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

तुम्हांला कोरोना झालाय हे कसं ओळखाल ? कोरोनाच्या टेस्ट कोणत्या आहेत ? जाणून घ्या ..

आरती मोरे | कोरोना वायरस गेल्या ३ महिन्यांपासून बातम्यांमध्ये आहे. १७ मार्चपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ४१पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत ज्यामध्ये एका वृद्धाचा मृत्यु झाला आहे.मात्र हे कसं कळत कि कोरोना कोणाला झालाय? आणि आपल्याला कोरोना झालाय के कस ओळखायचं?

कोरोनाची टेस्ट होण्यापासून ते तुम्हाला कोरोना झालाय आणि तुमचं नाव World Health organisation च्या लिस्ट मध्ये आलयं इथपर्यंतची सगळी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कोरोनाची टेस्ट म्हणजे आपल्या १० वीच्या परीक्षेसारखी आहे, आधी पूर्वपरिक्षा आणि मग नंतर बोर्डाची परीक्षा.म्हणजे यामध्ये मुख्यतः २ टप्पे आहेत . पहिल्या टप्प्यात कळतं की तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षण आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात कळतं की तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे .या सगळ्या गोष्टी जे ठरवतात त्या संस्थेचं नाव आहे ICMR म्हणजे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च. ज्या पद्धतीने १० वीच्या परीक्षेची संपूर्ण राज्यामध्ये केंद्रे असतात त्याच पद्धतीने ICMR ने देशभरामध्ये आपल्या टेस्ट लॅबोरेटरीज निर्माण केल्या आहेत . ICMR च्या वेबसाईटवर तुम्हाला ही माहिती मिळेल. आपल्या महाराष्ट्रात या लॅब्स नागपूर आणि मुंबईला आहेत तर संपूर्ण देशात या ५२ लॅब्स आहेत. या लॅब्स मध्ये आपल्या पूर्वपरिक्षेप्रमाणे पहिली टेस्ट केली जाते.
मात्र पहिली टेस्ट देण्याचा हक्क कोणाला आहे त्यासाठी पात्रता काय आहे ?
पहिली टेस्ट करण्यासाठी जी पात्रता आहे ती आपण पाहुया
१) ज्या लोकांना सर्दी ,घसा खवखवणे आणि ज्यांचं नाक वाहत आहे ते  लोक आणि जे कोरोनासंक्रमित देशातून आले आहेत ते म्हणजे इटली,चीन, इराण , साऊथ कोरिया सिंगापूर हॉंगकॉंग
२) कोरोना पॉसिटीव्ह लोकांच्या संपर्कात आलेले लोक
३) असे लोक ज्यांच्यात लक्षण नाहीयेत  पण ते वुहान, जपान या देशातून आलेत आणि ज्यांना वेगळं ठेवलयं

या लोकांचे सॅम्पल्स ५२ पैकी जी सर्वात जवळची लॅब आहे तिथे पाठवले जातात ,पण कसले  सॅम्पल्स  ? तर नाक आणि गळ्यातून घेतलेले. चमचासारखी एखादी वस्तू घालून ते सॅम्पल घेतात.आता हे सॅम्पल लॅब मध्ये गेल्यानंतर त्यांची PCR टेस्ट केली जाते (पॉलिमरी चैन रिॲक्शन टेस्ट ) जर वायरसच्या डीएनए किंवा आरएनएशी मिळतेजुळते जिन्स सॅम्पल्स मध्ये असतील तर टेस्ट पॉसिटीव्ह समजून पुढे पाठवली जाते मात्र या टेस्टची अचूकता १०० टक्के योग्य असेलही याची खात्री नसते,म्हणून जे १०० टक्के पॉसिटीव्ह वाटत आहेत ते फायनल  म्हणजे बोर्ड एक्झामसाठी पुण्याला पाठवले जातात .

NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ वायराॅलाॅजी मध्ये सॅम्पल्स पाठवले जातात.  तिथे या सॅम्पलची तुलना वुहानमधल्या कोरोना वायरसशी केली जाते . पुण्याचं NIV हे  WHO च्या फिचर लिस्ट मध्ये आहे . जेव्हा NIV सांगते हे सॅम्पल पॉसिटीव्ह आलं आहे तेव्हाच आरोग्ययमंत्रालय याची घोषणा करतं आणि त्यांनतर हा रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह आहे हे स्पष्ट होत आणि तो WHO च्या लिस्ट मध्ये समाविष्ट होतो .

Related posts

जेएनयू हल्ल्यात आइशी घोषसह ९ जण संशयित आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती

News Desk

त्यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे – मंगलप्रभात लोढा

News Desk

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी, कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

News Desk