HW News Marathi
महाराष्ट्र

महाविकास आघाडीने ८० दिवसांत जनतेला कसे मुर्ख बनवले याचा प्रस्ताव मांडणार !

नवी मुंबई | नवी मुंबईतील महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दोन दिवसाचे अधिवेशनाचे आयोजन केले आहे. भाजपचे हे अधिवेशन १५-१६ फेब्रुवारीला नवी मुंबईत घेण्यात आले असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी या अधिवेशनाचे उद्घाटन केले. भाजपच्या या राज्यव्यापी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून जनतेला कसे मूर्ख बनवले यावर प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली.

भाजपचे चंद्रकांत पाटील हे या अधिवेशनात जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. तसेच, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करतील. दरम्यान, या अधिवेशनाला भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह अनेक नेते अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, सेना-भाजपला जनमत मिळाल्यानंतर सेनेने आपली भूमिका बदलली पण आता भाजपची पुढची भूमिका काय असेल याबाबत या अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसेच, अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने जनतेला ८० दिवसांत कसे मूर्ख बनवले यावर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. तसेच एनआरसी आणि सीएए कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे अभिनदंन करत त्याचा प्रस्तावही यावेळी सादर करण्यात येईल, अशी माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिरासाठी भागवतांनी घातले दगडूशेठला साकडे

Gauri Tilekar

देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेवर आर्थिक संकट

News Desk

“राज्यपालांना भेटून १२ आमदारांच्या नियुक्त्या का रखडल्या हे विचारावं लागेल”, अजित पवारांचा संताप

News Desk