HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आता पुन्हा राज्य कसे काय गहाण टाकणार ? | अशोक चव्हाण

फैजपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच राज्य गहाण टाकले असून आता पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राज्य कसे का गहाण टाकणार ? असा खोचक सवाल कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. काँग्रेसतर्फे जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याची सुरुवात आज (गुरूवारी) फैजपूर येथून झाली आहे. यावेळी अशोक चव्हाण बोलत होते. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे, आणि आमदारदेखील यावेळी उपस्थित होते.

पुतळ्याची उंची तब्बल १०० फुटांनी कमी, आनंदराज आंबेडकर यांचा आरोप

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची तब्बल १०० फुटांनी कमी करण्यात आल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या या स्मारकासाठी आंबेडकरी अनुयायांनी अनेक आंदोलन केली होती. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फुटी पुतळा उभारण्याचा मुख्य प्रस्ताव आहे. इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या या स्मारकासाठी ७४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाचा आराखडा सर्व नेत्यांच्या सहमतीने मंजूर केला आहे. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरून वाद निर्माण केला जात आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. “वेळ पडली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तरी आम्ही ते करू,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

Related posts

‘अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन ‘शेलारांची शिवसेनेवर प्रखर टिका !

News Desk

मुख्यमंत्री निधी देताना कोणतीच काटकसर करत नाहीत, अब्दुल सत्तारांचा चव्हाणांना पलटवार

News Desk

Unlock 1.0 | पेट्रोल कंपन्यांची दरवाढ सुरूच

News Desk