HW News Marathi
राजकारण

गरज पडली तर आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू !

ठाणे | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाचा आराखडा सर्व नेत्यांच्या सहमतीने मंजूर केला आहे. तरी इंदूमिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरून वाद निर्माण केला जात आहे. या स्मारकाच्या उंचीवरून विरोधक मुख्यमंत्र्यांवर टीक करत आहेत. डॉ आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ‘वेळ पडली तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सणारकासाठी राज्य सरकार गहाण ठेवावे लागले तरी आम्ही ते करू’, अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अशा शब्दात विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

तसेच. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कर्तृत्वाची उंची पुतळ्याच्या उंचीवरून कृपया मोजू नका, असे देखील आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकांना केले. मुख्यमंत्री असे देखील म्हटले की, आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान ही भारताची खरी ओळख झाले आहे. संविधान आम्हाला गीता, बायबल आणि कुराण पेक्षा जास्त प्रिय असे म्हणाले.

रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य घटनेच्या मुद्द्यावरही काँग्रेस व राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. संविधानाला सर्वाधिक धक्‍का लावण्याचे काम काँग्रेसच्याच काळात झाले याची आठवण त्यांनी करून दिली. संविधान बदलणार असा अपप्रचार जे लोक करत आहेत त्यांना आपली वोट बँक जाण्याची भीती वाटते. परंतु आणीबाणीच्या काळात काँग्रेसचे सरकार असताना इंदिरा गांधींनी संविधानामधील अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचे संविधान एवढे मजबूत आहे की ते कोणीही बदलू शकत नाही. या संविधानामुळेच भारत जगभर ओळखला जातो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भाजपा सरकार समाजातील सर्व घटकांसाठी काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘मोदींनी अॅट्रॉसिटीचा कायदा मंजूर करुन घेतला. आरक्षण कायम ठेवलं. मराठा समाजालादेखील आम्ही नक्की आरक्षण देऊ. मात्र त्यासाठी इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही,’ अशी हमी फडणवीसांनी दिली.

Related posts

विद्या चव्हाण यांनी विधानभवनाच्या प्रांगणात रावतेंना का आडविले

News Desk

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

Aprna

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी राज्यातील सर्वात मोठा घोटाळा केला उघड…

News Desk