HW News Marathi
महाराष्ट्र

बारावीच्या निकालाबाबत अद्याप निर्णय नाही!

पुणे। बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. बारावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापनातील गुणांची माहिती संकलित करण्याचं काम अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे अंतिम निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यानं निकालाच्या तारखेबाबत अनिश्चितता कायम आहे. दरम्यान, बारावीचा निकाल ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

पूरपरिस्थितीमुळे निकालासाठी उशीर

राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापनाचे गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत पोचणे अशक्य झाले. यासह अनेक तांत्रिक अडचणींचाही सामना या कालावधीत करावा लागला. परिणामी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करणे शक्य झाले नाही. त्यामुळे अजूनही विभागीय मंडळाकडे महाविद्यालयांकडून निकालाचे गुण अपलोड होण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बारावीच्या अंतिम निकाल तयार करण्यासाठी आणखी एक-दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

निकाल पाहण्यात कोणतीही अडचण येणार नाही

दहावीच्या निकालाच्या वेळी अनेक अडचणी आल्या होता. मुलांना निकाल पाहण्यासाठी अडचणी येत होत्या. ‘‘बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक लिंकवर बारावीचा निकाल पाहता येईल, याबाबत शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूरातून ५ कोरोना संशयित हॉस्पिटलमधून पसार

swarit

एल्गार परिषद : शरजील उस्मानीचा पुण्यात पोलिसांनी नोंदवला जबाब

News Desk

बर्ड फ्ल्यूने एक ही जीवितहानी नाही, पशुसंवर्धन मंत्र्याची माहिती

News Desk