HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : पत्रकाराच्या अटकेप्रकरणी काय म्हणाले अमोल कोल्हे ?

मुंबई | देशासह महाराष्ट्र कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र कोरोना रुग्णांची संख्या ही ३ हजाराच्या पार गेली आहे. कोरोना वाढता संसर्ग, राज्यातील सद्याची परिस्थिती, वांद्रे गर्दी प्रकरण, एमपीएस विद्यार्थी आदी मुद्द्यांवर खासदार अमोल कोल्हे यांनी आज (१६ एप्रिल) एच. डब्ल्यू. मराठीशी खास बातचीत केली. वांद्रे प्रकरणात पत्रकाराल अटक होणे हे अत्यंत दुदैवी घटना असल्याचे म्हणत, अमोल कोल्हे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना या घटनेचा निषेध केला.

देशात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलला लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्यात आला. यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी (१४ एप्रिल) आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार, मजुरांची गर्दी जमा झाली होती. ही गर्दी पत्रकारच्या वार्तांकनामुळे झाल्याचा आरोप ठेवण्यात आला.

पत्रकारला वांद्रे प्रकरणी अटक करण्यात आली. या वांद्रे प्रकरणी प्रश्न विचारल्यावर अमोल कोल्हे एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले, लोक माध्यमांवर नक्की विश्वास ठेवतात. एका पत्रकाराला अटक होणे हे अत्यंत दुदैवी घटना असून मी त्यांचा निषेध करतो. ओरग्य विभागातील कर्मचारी असो वा पत्रकार आपलाल जीव धोक्यात घालून वार्तांकन करतो असतो. एखाद्या माहितीची शहा निशा न करता. या प्रकरणाला अनेक पैलू आहे. जसे की, रेल्वेचे ऑनलाईन बुकिंग कसे सुरू झाल्या आणि कोणाच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या, असा सवाल कोल्हे यांनी एच. डब्ल्यूच्या माध्यमातून उपस्थित केले आहे. पत्रकारला अटक करता त्यांच्या कोणी न्यूज होती. संवेदशीनल काळात कोणतीही बातमी देतात याबद्दल माहिती असावी, सर्वांच्या अधी बातमी देईन, अशी प्रवृत्ती असता कामा नये, या गोष्टी देखील त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना नमुद केल्या आहे.

अमोल कोल्हे पुढे म्हटले, पोलिसांनी पत्रकार राहुल कुलकर्णी यांना अटक केली. त्यांना मी ओळखतो ती अत्यंत जबाबदार व्यक्ती आहे. राहुल कुलकर्णी हे पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करतील, आणि नक्की कुठे तुट राहून केली हे देखील त्यांच्या माध्यमातून समोर येईल, अशी अपेक्षा अमोल कोल्हे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे.

 

संपूर्ण मुलाखत

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांकडे १२ नावांची यादी पोहोचली, प्रतीक्षा निर्णयाची!

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत देणार

News Desk

“… आणि भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्री साहेब तुम्ही हात जोडू नका!”

News Desk