HW News Marathi
Covid-19

HW Exclusive | राज्यात पर्यटन पुन्हा सुरु व्हायला ६ ते ७ महिने लागतील !

मुंबई | संपूर्ण जगाला सध्या ‘कोरोना’चा विळखा आहे. या ‘कोरोना’मुळे जवळपास सर्वच देश सध्या लॉकडाऊन आहेत आणि सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. मात्र, ‘कोरोना’चा सर्वाधिक फटका बसलेल्या अनेक क्षेत्रांपैकी एक आहे म्हणजे ‘पर्यटन क्षेत्र’. पर्यटन क्षेत्रावर सद्यस्थितीत आणि भविष्यात होणारा कोरोनाचा परिणाम अधिक तीव्र असण्याची शक्यता असल्याने या आव्हानाला सामोरे जाण्याची राज्याची रणनीती काय ? हे जाणून घेण्यासाठी आज (२९ एप्रिल) एच.डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या व्हिडीओ कॉल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी अदिती तटकरे यांनी ‘कोरोना’नंतरच्या काळात राज्यात पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी कोणकोणते मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात, तसेच त्यादृष्टीने कसे काम केले जाईल याबाबत एच. डब्ल्यू. मराठीशी सविस्तर बातचीत केली आहे.

राज्यात पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरु व्हायला किती वेळ जाईल ?

“लॉकडाऊननंतर राज्यात पर्यटन क्षेत्र सुरू व्हायला आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी लोकांची मानसिकता तयार व्हायला थोडासा वेळ लागेल. राज्यात पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरु व्हायला साधारणतः आणखी ६ ते ७ महिने लागतील. नोव्हेंबर-डिसेंबरच्या आधी नाहीच. लोकांची फिरण्यासाठीची, बाहेर जाण्यासाठीही मानसिकता तयार होणे खूप महत्त्वाचे आहे. मुळात, त्यांना सुरक्षित वाटणं सर्वात महत्त्वाचे आहे. आपण फिरायला जाऊ ते ठिकाण सुरक्षित असेल, आपल्याला कोणताही संसर्ग होणार नाही आणि तो वेळ आपण आनंदात घालवू शकू हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होणे येत्या काळात खूप आवश्यक आहे. तोच विश्वास निर्माण करणे हे पर्यटन क्षेत्रासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. आता सध्या ज्या स्थितीतून आपण जात आहोत ती पाहता ही मानसिकता हा विश्वास तयार होण्यासाठी थोडा वेळ लागेल”, असे अदिती तटकरे एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १७ हजारांहून अधिक नव्हे कोरोनाबाधित तर २९२ मृत्यू 

News Desk

मोदींच्या भेटीआधी अजित पवार, शरद पवार ठाकरेंच्या भेटीला वर्षावर !

News Desk

…नमस्कार, मी धनंजय मुंडेंच्या कार्यालयातून बोलतोय !

News Desk