HW News Marathi
Covid-19

HW Exclusive | ‘हे’ असेल पर्यटन क्षेत्रापुढचे सर्वात मोठे आव्हान

मुंबई | संपूर्ण जगाला सध्या ‘कोरोना’चा विळखा आहे. या ‘कोरोना’मुळे जवळपास सर्वच देश सध्या लॉकडाऊन आहेत आणि सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. मात्र, ‘कोरोना’चा सर्वाधिक फटका बसलेल्या अनेक क्षेत्रांपैकी एक आहे म्हणजे ‘पर्यटन क्षेत्र’. पर्यटन क्षेत्रावर सद्यस्थितीत आणि भविष्यात होणारा कोरोनाचा परिणाम अधिक तीव्र असण्याची शक्यता असल्याने या आव्हानाला सामोरे जाण्याची राज्याची रणनीती काय ? हे जाणून घेण्यासाठी आज (२९ एप्रिल) एच.डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या व्हिडीओ कॉल इंटरव्ह्यूच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी अदिती तटकरे यांनी ‘कोरोना’नंतरच्या काळात राज्यात पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी कोणकोणते मुद्दे महत्त्वपूर्ण ठरतात, तसेच त्यादृष्टीने कसे काम केले जाईल याबाबत एच. डब्ल्यू. मराठीशी सविस्तर बातचीत केली आहे.

‘हे’ असेल पर्यटन क्षेत्रापुढचे सर्वात मोठे आव्हान

पर्यटन क्षेत्रापुढचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे पर्यटकांमध्ये पुन्हा आत्मविश्वास निर्माण करणे. पर्यटकांना तो विश्वास देणे कि, तुम्ही या आणि तुम्ही सुरक्षित असाल. त्यामुळे, सर्वात शेवटी जर कोणतं क्षेत्र सुरू होईल तर ते पर्यटन क्षेत्र असेल, असे म्हणूया. कारण, कोरोनानंतर या लॉकडाऊननंतर प्रत्येकजण सर्वप्रथम काय करेल ? तर आपले आयुष्य रुळावर आणण्याचा प्रयत्न करेल. आपले दैनंदिन आयुष्य सुरळीत करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतरच मग कुठेतरी फिरायला जायचा वैगरे विचार करेल.

पर्यटन क्षेत्र सुरु करताना कोणकोणती खबरदारी घ्यावी लागेल ?

“लॉकडाऊन संपेल तेव्हा पहिल्यांदा अत्यावश्यक क्षेत्र सुरू होतील. अत्यावश्यक सेवा-सुविधा रुळावर आणल्या जातील. त्यानंतर हळूहळू पर्यटन. पर्यटन क्षेत्र सुरू करताना ते टप्प्याटप्प्याने सुरू करावं लागेल. अगदी आपली देवस्थाने, गडकिल्ले सुरू करतानाही खूप खबरदारी बाळगावी लागेल. हे सुरू करण्यापूर्वी थर्मल स्कॅनर, मेडिकल स्कॅनर, स्वच्छतागृहांची सोय, रेस्ट रूम हे सर्वांची सोय आहे का ? ते सर्वप्रथम पाहावे लागेल. आधी प्रायोगिक तत्वावर सुरू करून आवश्यक दुरुस्ती करावी लागेल. सगळे नियम आता बदलतील. आधीही स्वच्छता राखली जात होती मात्र आता आपण अधिक सतर्क असू. आपल्यासाठी ते आवश्यक आहे. आपल्याकडे देवस्थानांचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व मंदिर संस्थाने, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन यात समन्वय राखणे येत्या काळात खूप आवश्यक आहे”, अशी माहिती अदिती तटकरे यांनी एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२ ऑगस्टला लॉकडाउनच्या विरोधात ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन !

News Desk

मुंबईत आत्तापर्यंत १८७१ पोलिसांना कोरोनाची लागण

News Desk

देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

News Desk