HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive । नवाब मलिक उद्या करणार हवाला व्यवहाराच्या ‘दिल्ली कनेक्शनचा पर्दाफाश’ 

मुंबई । मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण राज्यात प्रचंड गाजलं. एकीकडे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी वाढल्या. तर दुसरीकडे या प्रकरणाच्या तपासामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे वादाच्या भोवऱ्यात सापडले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी ह्यात मोठी भूमिका बजावली. मलिकांनी दररोज वानखेडेंबाबत दाव्या-खुलाशांचं सत्रच सुरू केलं, धक्कादायक खुलासे केले.
गेल्या काही दिवसांपासून दररोज राज्याला आता नवाब मलिक पुढचा खुलासा काय करणार? याचीच प्रतीक्षा आहे. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे मॅनेजिंग एडिटर सुजित नायर यांनी आज (६ नोव्हेंबर) थेट नवाब मलिकांशी खास संवाद साधला आहे. आमच्या या मुलाखतीत मलिकांनी आपण उद्याच या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित हवाला व्यवहाराचं दिल्ली प्रकरण बाहेर काढणार असल्याचा मोठा दावा केलाय.

नवाब मलिक HW शी बोलताना म्हणाले की, “उद्या (७ नोव्हेंबर) मी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित हवाला व्यवहाराचं दिल्ली कनेक्शन नेमकं काय आहे? याचा पर्दाफाश करेन.” मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर आता उद्या नेमकं काय होणार? याची निश्चितच प्रतीक्षा आहे. आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणल्यानंतर आता याचं दिल्ली कनेक्शन काय असेल? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक

News Desk

गरिबांना लुटायचं आणि उद्योगती मित्रांचे खिसे भरायचे हा मोदींचा एक कलमी कार्यक्रम !

swarit

महामित्र अ‍ॅपमधील तांत्रिक त्रुटींमुळे निघाले सरकारच्या अब्रुचे धिंडवडे

swarit