HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive: विषारी पाण्याचे गाव, १४ लाख लोकांचा जीव धोक्यात

शिवाजी मामणकर | पाण्याला जिवन असे म्हणतात. मात्र महाराष्ट्रातील काही गावे अशी आहेत. जिथे हे पाणीच जिवन नसून मृत्यू बनले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या पाण्यामुळे काही गावातील तब्बल ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या बुलढाणा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील ही गावे आहेत. या गांवामधील जवळपास १४ लाख ८ हजार लोक किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पांचाळ नावचे असे एक गावा आहे. ज्या गावातील भीषण वास्तव पाहण्यासाठी एच. डब्ल्यू न्यूज नेटवर्क प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी पांचाळ गावातील पोहचले असता येथील ग्रामस्थ आणि किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेले एक रुग्ण संतोष मसाळ यांनी सांगितलेले वास्तव अतिशय भीषण असे होते.

गेल्या १० वर्षापासून संतोष हे किडनीच्या आजाराने त्रास्त आहे. संतोष यांचे अवघे ३५ वर्षाचे असून पत्नी आणि २ मुलांसोबत पंचाळ गावात राहतात. संतोष यांनी किडनीच्या आजारावर उपचार करण्यासाठी औरंगाबाद आणि मुंबई येथे लाखो रुपये खर्च केले आहेत. या उपचारासाठी संतोष यांनी होती नव्हती ती २ एकर जमीनही विकली. आणि उपचाराचा खर्च केला. परंतु किडनीचा हा अजार बरा झाला नाही. या अजारात संतोष यांना एक किडनी गमवावी लागली. यानंतर २०१२ मध्ये संतोष यांच्या आईने स्व:ताची किडनी देऊन त्यांचा जीव वाचविला होता. संतोष यांची दुसरी किडनी देखील खराब झाली असून आता फक्त ते त्यांच्या आईने दिलेल्या किडनीवर जीवंत आहे. या घटनेनंतर कळाले की, किडनी खराब होण्यामागेचे नेमके कारण म्हणजचे त्यांच्या गावचे पाणी हेच आहे. पाणी हे जीवन आहे. परंतु पांचाळ गावातील लोकांसाठी हेच पाणी जिवघेणे ठरले आहे. आता पुढील आयुष्य जगायचे कसे असा प्रश्न संतोष यांच्या कुटुंबासमोर उभा राहिला आहे.

खारपाण पटट्यात येणाऱ्या या भागातील पाणी अतिशय क्षारयुक्त आहे. त्यामुळेच आमच्या घरात ४ लोकांना किडनीचा आजार झाला आहे. यामुळे घरातल्या दोन लोकांचा मृत्यू झाला तर एक जण डायलिसिसवर आहे. माझी एक किडनी खराब झाल्यामुळे ती काढून टाकली. माझ्या आईने मला दुसरी किडनी दिली असून माझी अजून एक किडनी खराब झाली आहे. मी सध्या माझ्या आईने दिलेल्या किडनीवर जीवंत आहे. किडनीवर उपचार आणि त्यांच्या औषधांचा खर्च प्रचंड आहे. शासनाने आमचे दु:ख समजून आम्हाला मदत करावी अशी विनंती, पंचाळ गावचे ग्रामस्थ संतोश मसाळ यांनी एच. डब्ल्यूशी बोलताना केली आहे.

घरातील कर्ता पुरुष किडनी सारख्या आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे माझा नवरा आता काहीच काम करू शकत नाही. मी मोलमजुरी करून घराचा सर्व खर्च आणि दोन मुलांचा सांभाळ करते. परंतु या खाऱ्यापण्यापासून सुटका मिळावी म्हणून गावात फिल्टर लावावे, अशी मागणी केली होती. मात्र एकच फिल्टर लावण्यात आला आहे. परंतु या फिल्टरद्वारे पुरेसे पाणी देखील शुद्ध होते नाही. मग आम्ही शुद्ध पाणी आणायचे तर कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. यावर उपाय निघत नाही. तोपर्यंत आमच्या गावातील खारेपाणी पिण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही, अशी विवंचना संतोष यांच्या पत्नींने मांडली आहे.

बुलढाण्यातील पाण्याने १३ जिल्हे प्रभावित

बुलडाणा जिल्हात एकूण १३ तालुके आहेत. त्यामध्ये जळगाव, जामोद, संग्रामपूर या तालुक्यांमधील पाणी क्षारयुक्त आहे. ज्याचा अतिशय घातक असा परिणाम येथील नागरिकांच्या शरीरावर होत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे येथील नागरिकांना किडनीच्या आजाराने ग्रासले आहे. तर काही गावे अशी आहेत की, तेथील प्रत्येक घराघरात किडनीच्या आजारांने त्रस्त असेलेला एक तरी रुग्ण पहायला मिळतोच. लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच या आजाराने ग्रासले असून या आजारामूळे आतापर्यंत जिल्हयातील ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तब्बल १४ लाख ८ हजार लोक या किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. आणि एकूण ८०० रुग्ण डायलिसिसवर आपले आयुष्य जगत आहेत. दुष्काळी भाग असल्यामुळे शेतीची फार काही चांगली अवस्था येथे पाहायला मिळत नाही. त्यामुळे दारिद्र्य येथील गावकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. त्यात या आजाराचा प्रकोप अशात हे गाव सोडून जाण्याचा विचार केला. परंतु नेमके कुठे जायाचे हा सवाल येथील ग्रामस्थानां भेडसावत आहे. एच. डब्ल्यू. न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी मामणकर यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्हा पिंजून काढल्यानंतर संतोष मसाळ सारख्या अशा अनेक कहान्या ऐकयल्यानंतर आणि तुम्ही हे वाचल्यानंतर तुमचे मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही.

संग्रामपूर तालुक्यातीलच बोडखा

संग्रामपूर या गावतील अशोक उमाळे गेल्या आठ वर्षांपासून किडनीच्या आजाराशी झगडत आहेत. अशोक यांची आईने सांगितले की, त्यांना चार मुले होती. आता दोनच मुले या जगात असून एकाला किडनीच्या जीवघेण्या आजाराने आमच्यापासून दूर केले. तर दुसरा मुलाचा जीव मरणाच्या उंबरठ्यावर आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी औषधावर खूप खर्च येतो. परंतु हा खर्च आम्हाला परवडत नाही. आमच्या गावात सरकारने नळ लावले, परंतु या नळाला आठवड्यातून एकदा पाणी येते. इतर दिवशी पाण्यासाठी आम्हाला वणवण करावी लागते. नाही तर हेच क्षारयुक्त पाणी पिण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

अशोक यांच्या तर दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. आता तर अशी परिस्थिती आहे की, त्यांना पलंगावरुन उठताही येत नाही. अशोक यांनी किडनीच्या आजाराने आपला भाऊ देखील गमावला आहे. आता घरात त्यांची म्हतारी आई एक भाऊ आहे. ते दोघेही मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करात आहे. या आजारामुळे अशोक यांच्या हातात होते नव्हते, ते सर्व पैसे संपले. अशोक यांच्यावर एक वेळ अशी होती की, आसपासच्या लोकांनी वर्गणी करुन त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ही सर्व व्यथा अशोक उमाळे यांच्या वयोवृध आईने एच. डब्ल्यूशी बोलताना सांगितली. यावेळी तिच्या डोळ्यात पाणी दाटलेले होते.

किडनी खराब होण्यामागचे नमके काय का?

बुलढाणा जिल्ह्यात खारे पाणी असल्यामुळे येथील गावातील ग्रामस्थांच्या शरीरावर विपरित परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. मात्र पिण्याच्या पाण्याचा टिडीएस १२०० पेक्षा जास्त असल्यास ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही. डब्ल्यू.एच.ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या मते, पिण्यायोग्य असलेल्या पाण्याचा टीडीएस एका लिटरला ३०० एमजीपर्यंत उत्तम असतो. तर ३०० ते ६०० किंवा ६०० ते ९०० एमजी टीडीएस असलेले पाणी सुद्धा पिण्यायोग्य असते. मात्र या पाण्याचा टीडीएस ९०० ते १२०० किंवा १२०० पेक्षा जास्त असेल तर ते पाणी थोडे देखील पीण्यायोग्य राहत नाही. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील या गावत एवढी भीषण अवस्था आहे की, पाण्याचा टीडीएस १४०० पर्यंत आढळून आला. याचा अर्थ या पाण्यात क्षारांच प्रमाण प्रचंड आहे. ज्यामुळे पाणीच येथील लोकांसाठी घातक बनले आहे. परिणामी त्यांना हा किडनीचा आजार होतो. मात्र, शुद्ध पाणी आणायच कुठून हाही एक मोठाच प्रश्न येथील नागरीकांना कामय सतावत आहे.राजकीय अनास्था आणि कोपलेला निसर्ग अशा दुहेरी संकटात येथील स्थानिक आपले जीवन जगतायत.

उपचारासाठी डायलिसिस सेंटरवर गेलो तर तेथील परिस्थितीही अतिशय विदारक अशी आहे. दरोरोज येथे १३ ते १४ रुग्ण दाखल होतात. मात्र रुग्णालयात एक बेड रिकामा झाल्याशिवाय दुसरा रुग्ण भरती होऊ शकत नाही. मर्यादीत आसनव्यस्था असल्याने महिनोंमहिने रुग्णांना उपचारासाठी वाट बघावी लागते. अशात हातातून सुटत जाणारा वेळ यामुळे या रोगाचे सावटे अधिकच गहिरे होत जाते. शासनांने पुरेशी उपचाराची व्यवस्था तरी करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहे. या गावतील एक ६ वर्षाचा मुलगा ज्याला या आजारांने ग्रासले आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलाला दर महिण्याला वडीलांसोबत मुंबईला दवाखान्यात जावे लागते. निदान उपचारासाठी तरी शासनाने काही मदत करावी, या मुलाच्या काकाने केली आहे.

या गावात अजून काही घरांना भेटी दिल्यानंतर चित्र जवळपास सारखचे आहे. ज्यामध्ये ४५ वर्षांचे ज्ञानेश्वर शेंडे असतील यांनी सुद्धा आपल्या दोन्ही किडन्या गमावल्या आहे. याचप्रमाणे गजानन हागे, पुंजाजी अहिर, विजय खाज्बागे अशी किती नावे सांगायची या सगळ्या गावालाच जेव्हा हा रोग झाला तेव्हा तक्रार तरी कुणाला करायची हा सवाल येथील नागरिकांच्या मनात येत आहे. या गावांना कुणीच वाली नाही का? असा सवाल आपल्यालाही पडल्यावाचून राहत नाही. या आजाराबद्दल शासनाकडे तक्रार केली असता शासनाने हे क्षारयुक्त पाणी प्यूरीफाइड करण्यासाठी काही ठीकाणी आरो प्लांट लावले. ज्या गावातील पाणी सर्वाधिक क्षारयुक्त आहे. अशा ठीकाणी हे फिल्टर लावण्यात आले. मात्र काहीच दिवसात सरकारी योजनेप्रमाणे हे आरो प्लांटही बंद पडले. त्यामुळे आता या नागरिकांना हे क्षारयुक्त पाणी पिण्यावाचून पर्याय नाही. मग लाखो रुपये खर्च करून तरी काय उपयोग? हा प्रश्न येथील नागिरकांच्या मनात उपस्थित होत आहे. तर सरकार यात कधी लक्ष घालणार आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्री कुठली मोठी घटना घडण्याची तर वाट बघत नाहीये ना? , असा सवाल ग्रामस्थांच्या मनात नक्की उभा राहिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवणार

Gauri Tilekar

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी नाना पटोलें सायकलवरून विधानभवनात येणार

News Desk

…ही तर ओबीसींची फसवणूक; आरक्षणाला धोका देण्याचाही प्रयत्न! – पंकजा मुंडे

Aprna