HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive : ताटावरून उठायचं होतं तर जेवायला बसलाचं कशाला ?, सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीतील गोविंद बाग त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू शेट्टी विधानपरिषेदवर जाण्यास तयारही झाले मात्र संघटनेतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली नाराजी पाहता राजू शेट्टी शरद पवारांची ॲाफर नाकारतील असं चित्र सध्या आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळचे राजू शेट्टींचे मित्र आणि सध्याचे कट्टर विरोधक रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची मुलाखत एच. डब्ल्यू. मराठीने घेतली आहे. या वेळा राजू शेट्टी यांनीगेल्या १५ ते १८ वर्षापासून खासदार, आमदार आणि जिल्हापरिषदेचे पद भूषविले आहे, अजूनही त्यांची विधान परिषदेवर आमदार होऊन जाण्याची इच्छा आहे. राजू शेट्टी त्यांच्या पक्षातील कोणालाही संधी देत नाहीत ते आत्मकेंद्रीत आहेत असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

ताटावरून उठायचं होतं तर जेवायला बसलाचं कशाला ?

चळवळ करणाऱ्याला आमदारकी मिळत असेल तर मी निश्चितच स्वागत करतोय, असे सदाभाऊ खोत एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले. ’राजू शेट्टींनी मैदानातून पळ काढू नये. राजू शेट्टींनी आपल्या कार्यकर्त्यांनाही संधी द्यावी. तुम्ही महाविकासाघाडीसोबत गेला आहात आणि मग तुम्हाला तिकडून आमंत्रण आलेले तुम्ही स्वीकारले होते. आता उगीच जेवणाच्या ताटावर बसायचं आणि लोक काय बोलत आहेत ते बघून पुन्हा ताटावरून उठायचे! मग ताटावर बसायच्या अगोदर हा विचार करायला पाहिजे होता’असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना लगावला आहे.

’मी नामा निराळा’ हे दाखवण्याची राजू शेट्टींची जुनी पद्धत

राजू शेट्टींना त्यांच्या कार्यकर्त्यांचा होणारा विरोध हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा घेण्याला आहे की,राजू शेट्टींच्या आमदार होण्याला या प्रश्नावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, राज्यकीय व्यवहार समितीच्या बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, या बैठकीला ते स्वत: उपस्थित नव्हते. कारण माझे नाव येणार मग मी उभा रहणार मग हे योग्य नाही. मग आता सावकार मदनाईक, जालंधर पाटील यांचे नाव चर्चेला होते. मग ते कसे या बैठकीत उपस्थित राहिले? मात्र, सगळे करायचे आणि सगळे करून मी नामा निराळा कसा आहे, असे दाखवायचे ही राजू शेट्टी यांची जूनी पद्धत आहे. असे सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, राजू शेट्टींची पद्धत आहे की, चळवळीतील कोणीही त्यांच्याबरोबरीला आला की, त्या व्यक्तीला ते एकटे पाडतात. आणि मग त्यांचा काटा काढतात .असे अनेकांच्या बाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घडले आहे. यात पंजाबराव पाटील आणि अनेक नेत्यांचा समावेश आहे . राजू शेट्टी हे नेहमी एकट्या व्यक्तीला टार्गेट करतात, अशी बोचरी टिका सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

कार्यकर्ता बरोबरीत आला की त्याचा राजू शेट्टी काटा काढतात

राजू शेट्टींनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध हा कोट्यातील जागा घेण्याला आहे की, राष्ट्रवादीकडून आमदार होण्याला प्रश्नावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, “राज्यकीय व्यवहार समितीच्या बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, या बैठकीला ते स्वत: उपस्थित नव्हते. कारण माझे नाव येणार मग मी उभा रहणार मग हे योग्य नाही. मग आता स्वातर नाईक, पाटील यांचे नाव चर्चेला होते. मग ते कसे या बैठकीत उपस्थित राहिलेली होती. मात्र, सगळे करायचे आणि सगळे करून मी नामा निराळा कसा आहे, असे दाखवायचे ही राजू शेट्टी यांची जूनी पद्धत आहे. असे सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले. सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, राजू शेट्टींची पद्धत आहे की, चळवळीतील कोणीही त्यांच्याबरोबरीला आला की, त्या व्यक्तीला ते एकटे पाडतात. आणि मग त्यांचा काटा काढायचा. मग बाकीच्यांनी ज्याचा काटा निघतो, एकटा पडलेला व्यक्ती कसा चुकीचा आहे, त्या व्यक्तील ट्रोल करत रहायचे. असे अनेकांच्या बाबतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घडले आहे. यात पंजाबराव पाटील, बीजी काका, शिवाजीराव बहाने अशा अनेक मोठ्या नेत्यांनी राग आहे, आणि त्यांनी एकटा पाडून त्यांनी त्या व्यक्तींची शेकार केली. राजू शेट्टी हे नेहमी एकट्या व्यक्तीची करतात, अशी बोचरी सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले.

पक्षातील कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी द्यावी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटते की, त्यांनी आमदार व्हावे. राजू शेट्टींनी १० वर्ष खासदारकी भोगली. जिल्हापरिषद तीन साडेतीन वर्ष भोगली. आणि विधानसभेत पाच वर्ष आमदार राहिले, राजू शेट्टींनी अनेक वर्ष खासदार आणि आमदार राहिल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न काही का मांडले नाहीत ? तिथे काय आराम करायला गेलेले का?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे.

संपूर्ण मुलाखत

Related posts

किटकांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल तयार करण्याचा निर्णय! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

मुंबईहून मांडव्याच्या दिशेने जाणारी बोट समुद्रात उलटली, ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश

swarit

INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

News Desk