HW News Marathi
महाराष्ट्र

Hw Exclusive | जर हिंमत असेल,लढण्याची उमेद कायम ठेवली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी एचडबल्यू मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी बातचीत केली आहे. सध्याच्या काळात आरोग्य यंत्रणा सरकार कोरोनापासून बचाव करण्यासाठी काम करत आहे. आणि ते करत असलेल्यी कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे असे मत डॉ. अमोल कोल्हे यांनी एचडबल्यू मराठीशी बोलताना मांडले. तसेच, मुख्यंमंत्र्यांसोबत तुम्ही जवळून काम केले आहे तर आता ते करत असलेल्या कामगिरीबद्दल काय सांगाल असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आश्वासक पद्धतीने काम करत आहेत. वैद्यकीय क्षेत्राबद्दल माहिती जाणून घेण्याची त्यांच्यात एक जिज्ञासा आहे, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी एचडबल्यू मराठीशी बोलतान म्हटले. तसेच, आरोग्यमंत्री राजेश टोपेही करत असलेली कामगिरी ही कौतुकास्पद आहे असेही त्यांनी एचडबल्यू मराठीच्या आमच्या प्रतिनिधी आरती मोरे यांच्याशी बोलताना सांगितले.

एक डॉक्टर म्हणून आणि खासदार म्हणून लोकांना काय सांगाल असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, स्वच्छता राखा, डॉक्टरांच्या सल्ल्यांचे पालन करा. आणि मुख्य म्हणजे, आर्थिक चणचण जाणवणार आहे. त्यामुळे एचडबल्यू मराठीच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की हे ही दिवस जातील. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक उदाहरण दिले. छ६पती शिवाजी महाराज १३२ दिवस पन्हाळाच्या वेढ्यात अडकले होते, आग्राच्या कैदेत ८० दिवस अडकले होते, येसुबाई २८ वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होत्या. इतकं असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे स्वराज्य तडीस नेले. जर हिंमत असेल, लढण्याची उमेद कायम ठेवली तर नक्कीच परिस्थिती बदलू शकते असा मोला सल्लाही त्यांनी एचडबल्यू मराठीच्या माध्यमातून जनेला दिला. पुर्ण व्हिडोओ पाहण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजिदादांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचं हे कारस्थान!

News Desk

अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठविला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

News Desk

केंद्र सरकार देशात हळूहळू आणाबाणी आणतयं,मेट्रो कारशेड वादात सुप्रिया सुळे भडकल्या …

News Desk