HW News Marathi
महाराष्ट्र

मी नाराज आहे, ही बातमी मुळात चुकीची आहे !

मुंबई। मी नाराज आहे ही बातमी मुळात चुकीची आहे, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिले. खडसे पुढे म्हटले की, माझी मनधरणी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आले, यात देखील काही तथ्य नाही. आम्ही गेली अनेक वर्ष एकत्र आहोत. दोन राजकीय नेते एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा होतेच. त्यामुळे नव्याने आलेले सरकार आणि आपले सरकार का आले नाही याबाबत आमची चर्चा झालेली आहे, असे खडसे यावेळी म्हणाले.

दरम्यान, खडसे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसोबत आम्ही अनेक वर्षांपासून राजकारणात सोबत असल्याने या पक्षांमधील अनेक नेत्यांशी आमची जवळीक आहे. ते आमच्याशी बोलतात. प्रत्येकाला स्वाभाविक असे वाटते की, राजकीय जीवनात ४०- ४२ वर्ष असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षात आला तर पक्षाला बळकटी येऊ शकेल. त्यांनी अशा अपेक्षा व्यक्त करणे गैर नाही. परंतु याबाबत मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खडसे यांनी सांगितले की, काल दिल्लीमध्ये शरद पवार यांच्याशी माझी अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेमध्ये माझ्या मतदारसंघातील सिंचन योजनांसाठी मंत्रिमंडळाच्या शिफारशीसाठी त्यांनी मदत करावी यासाठी चर्चा केली. आज उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील याच सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा केली. ठाकरे यांनी या प्रकल्पाला मदत करण्याविषयी आश्वासन दिले आहे, असे खडसे यांनी सांगितले.

खडसेंनी फडणवीसांवर केली टीका

गेल्या पाच वर्षांपूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक होऊ शकले नाही, असे म्हणत खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. खडसे पुढे म्हणाले की, “औरंगाबादमध्ये उभारण्यासाठी जागा देखील उपलब्ध करुन दिली होती. मात्र मी मंत्रिमंडळाबाहेर आल्यानंतर हे स्मारक रखडले आहे. या स्मारकासाठी ठाकरे यांना विनंती केली असल्याचे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील ही विनंती मान्य केली असून प्राधान्याने गोपीनाथजी मुंडे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, असे ठाकरे यांनी सांगितल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान भाजपवर आपण नाराज नसल्याचे देखील खडसे यांनी सांगितले. आज तब्बल पाच वर्षांनंतर खडसे आणि ठाकरे यांच्यात भेट झाली.” या दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाल्यानंतर खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दत्ता पडसलगीकर यांच्या सेवा मुदतवाढीविरोधात रिट याचिका दाखल

News Desk

“लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका सांगावी, आम्ही बोलणार नाही” – छत्रपती संभाजीराजे 

News Desk

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटवा, कोळी भगिनींची राज ठाकरेंकडे साद

News Desk