HW News Marathi
देश / विदेश

फडणवीस सरकारने सांगितल्यामुळेच मी युक्तिवाद केला नाही ! मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश नुकताच जाहीर केलाआहे. त्यानंतर ही स्थगिती रद्द करण्याचा अर्ज याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दाखल केला आहे.परंतु आरक्षणावर स्थगिती आल्याने महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकासआघाडी सरकारने हा खटला नीट लढला नाही ,चांगले वकील दिले नाहीत असा आरोप भाजपकडून केला जात आहे.दुसरीकडे महाराष्ट्र सरकारचे माजी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ शेअर करून वेगळाच मुद्दा मांडला होता. महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोश कुंभकोणी हे आरक्षणाच्या प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी एकदाही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेले नाहीत. महाधिवक्ता म्हणून या प्रकरणात युक्तिवाद करणं त्यांचं कर्तव्य होतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळं आजच्या निर्णयाला तेही जबाबदार आहेत,’ असं कटनेश्वरकर यांनी म्हटलं होतं.

आपल्यावर करण्यात आलेले आरोप महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी फेटाळून लावले आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगितल्यामुळंच मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही, असा खुलासा कुंभकोणी यांनी केला आहे. प्रत्यक्ष युक्तिवादापासून मी दूर राहिलो असलो तरी सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकावं म्हणून मी प्रयत्नांची शर्थ केली होती. सर्व प्रकारची तयारी केली होती,असंही कुंभकोणी यांनी सांगितलं.

कुंभकोणी यांनी असा दावा केला आहे की,‘मराठा आरक्षण प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात फेब्रुवारी २०१९ मध्ये सुनावणी सुरू झाली होती. त्याआधी जानेवारी महिन्यात सोलापूर येथे मराठा संघटनांची बैठक झाली. त्यात सरकारच्या वतीनं माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांना युक्तिवाद करण्याची परवनागी द्यावी, अशी आग्रही मागणी मराठा संघटनांनी सरकारकडं केली होती. राज्य सरकारनं ती मागणी मान्य करून थोरात यांना संधी देण्याची विनंती माझ्याकडं केली होती. त्या विनंतीला मान देऊन मी खटल्यापासून दूर राहिलो होतो. त्यामुळे आता कुंभकोणी यांनी केलेल्या दाव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मराठा आरआरक्षणविषयक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संतापजनक ! संजय राठोडांसोबत चित्रा वाघ यांचे ‘मोर्फ’ केलेले आक्षेपार्ह फोटोज व्हायरल

News Desk

देशात पहिल्यांदच केली जाणार ‘श्रमगणना’

News Desk

अमृता फडणवीसांच्या अमित शाह यांना ‘चाणक्य’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा!

News Desk