HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई राजकारण

कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत अशी इच्छा नव्हती, पण…! | मुख्यमंत्री

मुंबई | राज्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊन आणि अन्य दिवस मिनी लॉकडाऊन लावून अनेक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, राज्याच्या या निर्णयाच्या विरोधात आता हळूहळू विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य आक्रमक व्हायला सुरुवात झाली आहे. याविषयी व्यापाऱ्यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केले आहे. राज्यातील विविध व्यापारी संघटनाच्या पदाधिकारी, प्रतिनिधींशी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. “लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे हे पाऊल कोरोनाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कोणाच्या विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. व्यापाऱ्यांनीही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाय योजना केल्या जातील. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करूया”, असे आवाहन आज (७ एप्रिल) मुख्यमंत्र्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले कि, “कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. कोणत्याही राज्याने केली नसेल अशा सुविधा निर्माण केल्या. पण या सुविधाही अपुऱ्या पडण्याची वेळ येईल, अशी स्थिती येण्याची शक्यता आहे. लसीकरण सुरु झाले. पण लसींचा साठाही आता संपून जाणार आहे. लसीचा साठा संपू लागला आहे. नव्या लाटेत आता तरूण वर्ग यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित होऊ लागला आहे. कारण तो रोजगार, कामांसाठी फिरतो आहे. लक्षण नसलेल्यांची संख्या ७०  टक्क्यांहून अधिक आहे. त्यांच्यामुळे इतर अनेक बाधित होण्याची शक्यता आहे.”

 मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील !  

मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकड्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दुर्दैवाने कोरोनाचा पहिला घाला मुंबईवर झाला. आता दुसऱा हल्लाही आपल्यावरही झाला आहे. बाहेरच्या राज्यातून आणि परदेशातूनही येणे जाणेही मुंबईत मोठ्या प्रमाणत आहे. त्यामुळे मुंबईची सुरक्षा नीट ठेवली, तर राज्याची आणि देशाची सुरक्षा नीट राहील. त्यासाठी यापुर्वीच खासगी कार्यालयांना कामांच्या वेळांमध्ये बदल करण्याचे, वेगवेगळ्या शिफ्ट करण्याचे आवाहन केले होते. आताही हेतू दुकाने बंद करणे हा नाही. तर गर्दी टाळणे हा आहे. मुंबईतील धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे.”

रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका !

मुख्यमंत्री म्हणाले, “कोरोना पूर्ण जात नाही. तोपर्यंत शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. आपण सर्व एक आहोत. शांतपणे, कुठलाही धोका न पत्करता कोणत्या उपाय योजना करता येतील, याचा विचार करू. सगळ्याना विश्वासात घेऊन पुढे जायचे आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या”, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related posts

‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’

News Desk

राम मंदिराकरिता शिवसेनेने केलेल्या १ कोटींच्या घोषणेतील १ रुपयाही अद्याप आलेला नाही !

News Desk

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ हजार २८१, तर जगभरातील देशाच्या यादीत १२ व्या क्रमांकावर

News Desk