मुंबई | आपल्या संपूर्ण देशाला कोरोनाचा विळखा आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा संपूर्ण देशात सर्वाधिक आहे. तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही कोरोनाची सर्वाधिक झळ बसली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील या कोरोनास्थितीबाबत चिंता व्यक्त करणारे एक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. “सद्यस्थितीत मुंबईत जाण्याची हिंमत माझ्यात नाही”, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे. देशात सुरुवातीपासूनच कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुर्दैवाने पहिल्या क्रमांवर राहिली आहेत. तर राज्यातील मुंबई, पुण्यासारखी मोठी शहरे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली आहे.
I don't have any daring to come to Mumbai right now, the way in which the situation is now. I feel the time will definitely change: Union Minister Nitin Gadkari pic.twitter.com/mwcLKJkg07
— ANI (@ANI) June 16, 2020
“मुंबईत सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता माझ्यात मुंबईला जाण्याची हिंमत नाही. परंतु, मला निश्चित असा विश्वास आहे कि मुंबईतील ही परिस्थिती नक्की बदलेल”, असे विधान नितीन गडकरी यांनी केले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या अर्थातच मुंबईत आहेत. एकट्या मुंबईत आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५९, २०१ वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आपला जीव गमावलेल्यांचा आकडा २,२४८ इतका झाला आहे. महत्त्वाची बाब अशी कि मुंबई, पुण्यासारख्या सतत वर्दळ असणाऱ्या आणि विशेषतः दाटीवाटीच्या वस्त्या असणाऱ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणणे हे प्रशासन, शासनासाठी मोठे आव्हानात्म झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.