HW News Marathi
महाराष्ट्र

गेली 20 वर्षे आपली सेवा केल्यामुळे मी आज आमदार आणि मंत्री झालो! – धनंजय मुंडे

बीड | परळी मतदार संघातील गरीब जनतेच्या रेशन कार्ड वाटप कार्डची दुरुस्ती नाव वाढविणे सेवा सप्ताह कार्यक्रम प्रसंगी बोलतांना राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे बोलतांना म्हणले. मुंडे पुढे म्हटले की, गेली 20 वर्ष्यापासून मी या मतदार संघातील जनतेची अविरत सेवा करत आहे. यांचे आशीर्वाद म्हणजे साक्षात देवाचे आशीर्वाद आहेत आणि यांच्यामुळेच मी आज आमदार आणि मंत्री बनू शकलो.

धनंजय मुंडे म्हणले की, एकदाचा मंत्री झालो म्हणून मी या जनतेला कसा विसरेल मी कायम यांच्या ऋणात राहू इच्छितो म्हणत पंकजा मुंडे यांना टोला लगावला. धनंजय मुंडे म्हणाले की, नवीन रेशन कार्ड फक्त वाटप न करता याबाबत आपल्याला आणखी काही लागत असेल ते सर्व देण्याचे मी आज आपल्याला शब्द देतो. कोविडच्या काळात ज्या हाताला कामे नव्हती. त्या घरात राशेन पुरवण्याचे आम्ही काम केले गरजूंना मदत केली दवाखाच्या बाबतीत ही आम्ही दिवसरात्र आम्ही आपल्या सेवेत आहोत आणि पुढेही आपल्या सेवेत असणार असल्याचा ही या प्रसंगी बोलतांना परळी मतदार संधातील जनतेला शब्द दिला, असे ते म्हणाले. 

आज जे ही मी अपल्यासाठी करतोय ते काही वेगळे करत नाही. ते माझे कर्तव्य आहे तो माझा धर्म आहे वेगळे काहीच नाही आणि मी हे आयुष्यभर करत राहणार आणि माझे सहकारी देखील आपली सेवा करतच राहणार आहे, असे ही ते म्हणाले. या प्रसंगी परळी तहसील कार्यालयाचे तहसीलदार, नायब तहसीलदार रुपनर उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, आयोजक डॉ संतोष मुंडे आदी सह पत्रकार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा एकत्र चिपळूण दौऱ्यावर

News Desk

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या आम्हांला देऊ नका ,सामनामधून शिवसेनेचा भाजपवर वार..

News Desk

महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने ! अर्णबवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा भाजपकडून निषेध …

News Desk