HW News Marathi
महाराष्ट्र

“माझे घर, कार्यालय आणि माझ्या नातवावर नजर ठेवली जाते!” – नवाब मलिक

मुंबई | “काही पक्षातील कार्यकर्ते माझ्या घर, कार्यालय आणि माझ्या लहान नातू कोणत्या शाळेत शिकतोय त्याची माहिती काढत करत असल्याची मला मिळाली आहे. मागच्या आठवड्यात मी दुबईत गेलो असताना दोन व्यक्ती कॅमेरा घेऊन माझ्या घराचे फोटो काढत होते. यावेळी परिसरातील लोकांनी त्या व्यक्तीला वापरले. यानंतर ते व्यक्ती पळून गेले. मग त्यांना टिळक टर्मिनस येथे अडवले,” अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून दिली आहे.

मलिक म्हटले, मी लवकरच त्या व्यक्तीविरोधात देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितलेते “मी ट्विटरवर या दोन व्यक्तीचे फोटो टाकले असून जर कोणी या व्यक्तींना ओळखत असेल तर मला त्यांची माहिती द्या. या व्यक्तींना जी काही माहिती हवी असेल तर त्यांनी मला भेटावे, मी त्यांना हवीती सर्व माहिती देईल, असे म्हटले. मलिकांनी दोन व्यक्तींचे फोटो पोस्ट करत केला आहे.

दरम्यान, मुंबई क्रूझ प्रकरणानंतर एक व्यक्ती मागील २ महिन्यापासून राज्यात जे सुरू होते. त्यावरून माझ्याविरोधात ट्वीट करत होती. या व्यक्तींचे नावसमोर आले आहे. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार देणार आहे. मी जेव्हा कुठे कागदपत्रे काढायला जातो किंवा कोणत्याही विभागात तक्रार करायला जातो. त्या ठिकठिकाणी यातील एक व्यक्ती दिसून आली आहे. त्यांना व्यक्तींना नेमके काय करायचे आहे?”

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे उद्या घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

“दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती” नितीन गडकरींना सांगितला ‘तो’ किस्सा

News Desk

सहा भाविकांना विषबाधा, एकाचा मृत्यू

News Desk